Fact Check | यूक्रेनच्या महिलेचं रशियाच्या टँकमध्ये जाऊन धक्कादायक काम

रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध (Russia Ukraine War) क्षमण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धामुळे अनेक विपरित परिणाम पाहायला मिळत आहेत.

Updated: Mar 2, 2022, 03:08 PM IST
 Fact Check | यूक्रेनच्या महिलेचं रशियाच्या टँकमध्ये जाऊन धक्कादायक काम title=

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध (Russia Ukraine War) क्षमण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धामुळे अनेक विपरित परिणाम पाहायला मिळत आहेत.  रशियन सैन्याकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बफेक सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव जवळ पोहचले आहेत. रशियन टँक आणि इतर लष्करी वाहनं प्रवास करत आहेत. या सर्व युद्धादरम्यान सोशल मीडियावर या युद्धाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. (russia ukraine war one woman going inside russian tank video viral fact check) 
 
अशाच एका व्हीडिओत एक महिला रिकाम्या लष्करी रणगाड्यात शिरुन तो चालवण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. 
 
हा व्हायरल होणारा व्हीडिओ टिकटॉकचा आहे. महिलेने हा व्हीडिओ शेअर करत रशियन लष्टकरच्या टॅंकमध्ये (Russian Military Vehicles) शिरुन तो चालवायला शिकत असल्याचा दावा केला आहे. 

एका महिलेने टिकटॉकवर व्हिडिओ टाकून दावा केला आहे की, रिकाम्या रशियन लष्करी टाकीत शिरली आणि नंतर ती चालवायला शिकली.

व्हायरल होणाऱ्या व्हीडिओत नक्की काय? 
 
या व्हीडिओत ही महिला लष्कराच्या टँकमध्ये शिरताना दिसते. तसेच ती महिला या व्हीडिओत तिच्या भाषेत टँक सुरु कसा करायचा, गिअर कसा टाकयचा आणि तो चालवायचा कसा, हे सांगत आहेत. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हीडिओ  @PSFAERO या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दरम्यान झी 24 तास या व्हीडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.