बांग्लादेश : तो चिखलात रुतलाय...त्याला त्यातून बाहेर यायचय..खरतर त्याच वय धड चालण्याचही नाहीए..त्याच्या मदतीलाही कोणी नाहीए..त्यामूळे स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर त्याला त्यातून बाहेर पडावच लागणार आहे.. खर तर जगणं-मरणं काय असत हेदेखील या चिमुरड्याला माहित नाहीए..पण तरीही त्याचा संघर्ष सुरूच आहे...असं ह्रदय हेलवणार चित्र तुम्ही पाहिलय का ?
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या वेदना दर्शविणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. बांग्लादेशातील कॉक्स मार्केट रेफ्यूजी शिबिरजवळील नदीच्या चिखलात एक मुलगा जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेरात हा दुर्देवी क्षण टिपला आहे. हा फोटो जगभरात व्हायरल होत आहे. पाहणाऱ्याला एक प्रकारचा धक्काच बसत आहे. ही नदी ओलांडताना वेगवेगळ्या घटनांमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत. यामध्ये वृद्ध आणि बालकांचा समावेश आहे.
या एका फोटोतून रोहिंग्या मुसलमानांवर काय परिस्थीती ओढविली असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. म्यानमारमधून भयभीत होऊन पळालेले रोहिंग्या बांगलादेशच्या दिशेने कूच करत आहेत. वाटेत त्यांना दलदल ,उपासमार, अत्याचार अशा असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.