मुंबई : काही नात्यांबद्दल बोलण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. पती- पत्नीचं नातंही त्यापैकीच एक. कोणासाठी ते पावित्र्याचं प्रतीक, तर कोणासाठी मैत्रीचं. कोणासाठी मोठा आधार, तर कोणासाठी हक्काची जागा. प्रत्येकासाठीच या नात्याची रुपं महत्त्वाची.
या नात्यात असणाऱ्या दोन व्यक्ती कायमच एकमेकांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, या नात्यातही गुपितं आहेतच. पती आणि पत्नी एकमेकांशी कितीही मोकळेपणानं बोलले, तरीही काही गोष्टी मात्र ते कायमच एकमेकांपासून लपवून ठेवतात.
पतीरायांचे लपवण्यासाठीचे विषय वेगळे असतात. तर, पत्नी पतीपासून भलत्याच गोष्टी लपवताना दिसते. चला जाणूया पत्नी, पतीपासून नेमकं काय लपवते... (relationship Wife hide these Secrets from husband read interesting facts)
नातेवाईक आणि मुलांशी संबंधित गोष्टी - निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे की महिला बऱ्याचदा नातेवाईकांबाबत चिंतेत असतात. पण, त्या कधीच पतीला हे सांगत नाहीत. मुलाबाळांबद्दलच्या काही निर्णयांची चिंताही त्यांना सतावत असते.
सीक्रेट क्रश- बहुतांश महिलांना मनातल्या मनाकत कोणतरी व्यक्ती (पुरुष) आवडत असतो. पण, त्या याबद्दल कोणालाच सांगत नाही. मैत्रीणींना महिला या बाबतीत सांगतात पण, पतीला सांगताना मात्र संकोचतात.
बचत- घर खर्चाला मिळणाऱ्या पैशांतूनही महिला काही पैसे वेगळे साठवतात. पण याची माहिती त्या कोणालाच देत नाहीत. पण, अडचणीच्या वेळी महिलांची हीच साठवलेली रक्कम कामाला येते.
ऑफिसमधील गोष्टी- नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या गोष्टी किंवा वाद महिला फार क्वचित पतीला सांगतात. काहीजणी तेसुद्धा सांगत नाहीत. अनेकदा आपल्या प्रगतीबद्दलही त्या पतीला सांगत नाहीत. पतीला वाईट वाटू नये यासाठीच त्यांचा हा प्रयत्न असतो.
शारीरिक समस्या- महिला त्यांच्या आरोग्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतात. पतीला कोणतीही नवी अडचण होऊ नये, यासाठीच त्या असा निर्णय घेतात.