12 वर्षांनंतर समोर आला त्सुनामीचा धक्कादायक Video; पाहून वाढेल हृदयाची धडधड

Rare Video Japan Tsunami: जपानमध्ये हाहाकार माजवणाऱ्या या त्सुनामीच्या तडाख्यामध्ये 18 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 2, 2023, 10:35 AM IST
12 वर्षांनंतर समोर आला त्सुनामीचा धक्कादायक Video; पाहून वाढेल हृदयाची धडधड title=
तब्बल 12 वर्षानंतर समोर आला हा धक्कादायक व्हिडीओ

Rare Video Japan Tsunami: मानवाने कितीही प्रगती केली तरी तो निसर्गावर नियंत्रण मिळवू शकत नाही, असं म्हटलं जातं. खरं तर निसर्गामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मानवाचं पृथ्वीवरील अस्तित्व टिकून आहे. मात्र प्रगतीच्या मागे धावताना मानवाचा निसर्गाचं भान राहिलेलं नाही अशी टिका जागतिक पर्यावरण बदलांसंदर्भात म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलताना केली जाते. मानवाची हाव आणि निसर्गाकडून आवश्यकतेपेक्षा अधिक ओरबाडून घेण्याची विचारसणीच मानवाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार आहे असं म्हटलं जातं. निसर्ग अनेकदा मानवाला या ऱ्हासाचे संकेत देत असतो किंवा निसर्गावर अतिक्रमण धोक्याचं ठरु शकतं याबद्दल नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून संकेत मिळत असतात.

12 वर्षानंतर समोर आला व्हिडीओ...

मानवाला त्याची जागा दाखवणाऱ्या अनेक नैसर्गिक घटना थक्क करणाऱ्या असतात. आपल्या गरजेनुसार निसर्गामध्ये वाटेल तसे बदल केले तरी काहीही फरक पडणार नाही हा अंहकार निसर्ग एका फटक्यात मोडून काढू शकतो. भूकंप, त्सुनामी, वादळं यासारख्या गोष्टी क्षणात होत्याचं नव्हतं करु शकतात. अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये होणारी वित्तहानी आणि जीवितहानी पाहत बसण्याशिवाय मानवाकडे काहीही पर्याय नसतो. 2011 साली मार्च महिन्यात जपानमध्ये आलेली त्सुनामी ही याच प्रकारची होती. या त्सुनामीने अवघ्या क्षणभरामध्ये लाख लोकांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. या त्सुनामीच्या वेळीचा एक व्हिडीओ तब्बल 12 वर्षानंतर समोर आला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

आता 12 वर्षापूर्वीच्या या व्हिडीओमध्ये शहरांमध्ये शिरणाऱ्या त्सुनामीच्या लाटा कशाप्रकारे घरं, गाड्या आणि वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट स्वत:बरोबर वाहून नेत आहेत हे दिसत आहे. रस्त्यावर लोक या त्सुनामीच्या लाटांपासून वाचण्यासाठी पळत असल्याचं दिसत आहे. 

अनेकजण वाहून गेले

11 मार्च 2011 ला जपानमध्ये त्सुनामीने थैमान घातलं. समुद्रातील उंच लाटा शहरांमध्ये शिरल्याने अनेकजण वाहून गेले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली. समुद्राचं रौद्र रुप पाहून अनेकांना धक्का बसला. त्यावेळेस सोशल मीडियाचा एवढा प्रभाव नव्हता. मात्र टीव्हीवरुन वृत्तांकन करताना वृत्तवाहिन्यांनी दाखवलेली दृष्यं अंगावर काटा आणणारी होती. 

18 हजार जणांचा मृत्यू

पॅसिफिक समुद्रात आलेल्या भूकंपामुळे 2011 साली जपानला त्सुमानीचा तडाखा बसला होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 18 हजार जणांचा मृत्यू झाल्याचं जपानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.