अन चक्क नावामुळे 'या' तरूणाला पोलिसात नोकरीची संधी मिळाली

नावाचा प्रभाव लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो हे तुम्हांला ठाऊक आहे. पण नावाचा फायदा नोकरी मिळवण्यासाठी होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 25, 2017, 01:16 PM IST
अन चक्क नावामुळे 'या' तरूणाला पोलिसात नोकरीची संधी मिळाली  title=

इंडोनेशिया : नावाचा प्रभाव लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो हे तुम्हांला ठाऊक आहे. पण नावाचा फायदा नोकरी मिळवण्यासाठी होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

इंडोनेशियामध्ये चक्क एका मुलाला त्याच्या नावामुळे पोलिसात भर्ती होण्याची संधी मिळाली आहे. हे सारं वाचून असं त्या मुलाचं नेमकं नाव काय होतं ? असा प्रश्न आलाच  असेल ना ? 

 हटके स्टोरी 

इंडोनेशियामध्ये एका मुलाला नोकरी मिळवण्यासाठी चक्क त्याच्या नावाचा फायदा झाला आहे. मिळालेली नोकरीदेखील पोलिस खात्यातील आहे. या नशीबवान मुलाचं नाव ' पोलीसी' आहे. इंडोनेशियामध्ये पोलिसांचा उल्लेख 'पोलीसी' असा केला जातो. 

कशी मिळाली नोकरी ?  

कुवेत टाईम्सच्या वृत्तानुसार, एकदा पोलिसांनी 'पोलीसी' नावाच्या या मुलाला लायसन्सशिवाय ड्राईव्हिंग करताना पकडलं. या चूकीचा दंड भरल्यानंतर जेव्हा पावतीवर नाव लिहण्यासाठी विचारणा झाली तेव्हा 'पोलीसी' हे नाव ऐकून त्यांनाही नवल वाटले. 

स्थानिक पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनला नेले. तेथे 'पोलीसी'ची अधिक विचरणा केल्यानंतर हा घरातील एकमेव कमवणारा व्यक्ती असल्याचं त्यानं सांगितले. पोलिसांनी तेव्हाच त्याला पोलिसांसोबत काम करण्याची संधी दिली.   

'पोलीसी' नावाचा हा तरूण आता स्थानिक पोलिसांसोबत ड्राईव्हिंग लायसन्स  टेस्टसाठी मदतीचे काम करतो.