वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेत मीडिया विरुद्ध डोनाल्ड ट्र्म्प यांच्यामध्ये सतत वाद सुरू असतात. अमेरिकेत मीडिया 'अॅन्टी ट्रम्प' असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे.
गेल्यावर्षी 'टाईम्स' मासिकाने डोनाल्ड ट्रम्प यांची निवड पर्सन ऑफ द इयर म्हणून केली होती. त्यानंतर यंदा टाईम्सने त्यांच्याकडे विचारणा केली होती मात्र मीच नाकारले अशा आशयाचे एक खास ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
Time Magazine called to say that I was PROBABLY going to be named “Man (Person) of the Year,” like last year, but I would have to agree to an interview and a major photo shoot. I said probably is no good and took a pass. Thanks anyway!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 24, 2017
टाईम्सने मला 'पर्सन ऑफ द इयर' बाबत विचारणा करताना संभाव्यता आहे की तुमचं नाव निवडलं जाऊ शकतं पण त्यासाठी तुम्हांला मुलाखत आणि फोटोशूटसाठी यावं लागेल अशी माहिती दिली. त्यामुळे मीच ही 'संभाव्यता' मला योग्य वाटत नाही असं म्हणत ही ऑफर नाकारल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.
दरवर्षी 'टाईम्स' मासिक ऑनलाईन पोलच्या माध्यमातून 'पर्सन ऑफ द इयर' ची निवड करतो. वर्षभराच्या कालवधीमध्ये चांगल्या वाईट गोष्टींसाठी चर्चेत असलेलं नाव यासाठी शॉर्ट लिस्ट केलं जातं. यंदादेखील ६ डिसेंबरपर्यंत हा पोल सुरू आहे. त्यानंतरच विजेत्याचं नाव ठरणार आहे.
गेली अनेक वर्ष रिअल इस्टेटमध्ये काम करणारे व्यवसायिक म्हणून डोनाल्ड ट्रम्पची ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्येही त्यांचं नाव 'टाईम्स' मासिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर'च्या नामावलीत नसल्याने ते खट्टू झाले होते. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकाही केली होती.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर २०१६ साली 'टाईम्स'च्या कव्हरपेजवर झळकले होते. प्रेसिडेंट ऑफ द डिवाइडेड स्टे्टस ऑफ अमेरिका' या शीर्षकाखाली त्यांचा फोटो झळकला होता.