अमेरिका दौऱ्यासाठी मोदी वॉशिंग्टनमध्ये, गुगल-मायक्रोसॉफ्टच्या सीईओंना भेटणार

पोर्तुगालचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत.

Updated: Jun 25, 2017, 05:48 PM IST
अमेरिका दौऱ्यासाठी मोदी वॉशिंग्टनमध्ये, गुगल-मायक्रोसॉफ्टच्या सीईओंना भेटणार title=

वॉशिंग्टन : पोर्तुगालचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत. मोदी आज विविध कार्यक्रमात सहभाही होणार असून उद्या ते अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी मोदींचं ट्विटरवरुन स्वागत करत 'खरा मित्र' असा त्यांचा उल्लेख केलाय.

अमेरिकेत भारताचे राजदूत नवतेज सरना आणि त्यांची पत्नी अविना सरना तसेच अमेरिकेच्या भारतातील राजदूत मेरी के लॉस कार्लसन यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींच्या स्वागतासाठी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर भारतीय समुदायाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अमेरिकेच्या या दौऱ्यामध्ये मोदी आज अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्यासारख्या बड्या कंपन्यांच्या सीईओना भेटणार आहेत. व्हिजा, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत या सीईओंशी मोदी चर्चा करणार आहेत. 

पंतप्रधान पदाची सूत्र सांभाळल्यानंतर मोदींचा हा पाचवा अमेरिका दौरा आहे. उद्या मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा होणार असल्यासं सांगण्यात येते. मोदींच्या सन्मानार्थ यावेळी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये डीनरचं आयोजन केलंय. या दौ-यादरम्यान दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणात अमेरिकेची मदत आणि दोन्ही देशातील व्यापारी संबंधाच्या बळकटीसंदर्भात चर्चा करणार आहेत.