पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

Updated: Jul 5, 2017, 09:19 AM IST
पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट title=

तेल अव्हिव : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

कृषी, जलव्यवस्थापन, स्मार्ट सिटी आणि संरक्षण तंत्रज्ञान या चार महत्वाच्या क्षेत्रासंदर्भात इस्त्रायलशी करारशी अनेक करार करण्यात येणार आहेत. इस्त्रायलनं भारतातल्या स्टार्ट अप्ससाठी एका विशेष फंडाचीही निर्मिती केलीय.. त्यामार्फत भारतात संशोधन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या संधींविषयीही आज चर्चा होणार आहे.