आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत

तीन दिवसांच्या परदेश दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं.

Updated: Jul 4, 2017, 09:01 PM IST
आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत  title=

तेल अवीव : तीन दिवसांच्या परदेश दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं. तेल अवीवमधल्या बेन गुरीअन विमानतळावर स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नितन्याहू आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं.

अमेरिकेचे अध्यक्ष आणि पोप यांचंच याआधी अशा प्रकारे भव्य रेड कार्पेट स्वागत करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी विमानातून उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नेतन्याहू पुढे आले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आपुलकीने एकमेकांचे हात हातात घेऊन दोनदा अलिंगन दिलं.

ज्यू राष्ट्र असलेल्या इस्रायलला भेट देणारे मोदी हे ७० वर्षांतले भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. यावेळी विमानतळावरच केलेल्या छोटेखानी भाषणात नितन्याहू यांनी मोदींना संबोधून हिंदीत आपका स्वागत है मेरे दोस्त असं म्हंटलं. तर मोदींनीही आपल्या भाषणाची सुरुवात हिब्रू भाषेतून करताना, इस्राइलचा दौरा हा आपला सन्मान असल्याचं म्हंटलंय. यानंतर बोलताना दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रात द्वीपक्षीय संबंध अधिक वृद्धींगत करणं, तसंच दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याचं म्हंटलं.

पाहा काय म्हणाले नितन्याहू

इस्रायलमध्ये मोदींचं जंगी स्वागत