Petrol Rate : एका झटक्यात पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, सर्वसामांन्यांसाठी गुडन्यूज

सरकारच्या या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा (Petrol Rate) डिझेल महाग झालं आहे.

Updated: Oct 1, 2022, 11:09 PM IST
Petrol Rate : एका झटक्यात पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त, सर्वसामांन्यांसाठी गुडन्यूज title=

कोलंबो :  आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंका सरकारने (Sri Lanka) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात लिटरमागे (Petrol Rate) 40 रुपयांची कपात केली आहे. पेट्रोलच्या किमतीत कपातीची घोषणा करताना ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर  (Sri Lankan Energy Minister Kanchan Vijay Shekhar) म्हणाले की आता 1 लीटर पेट्रोल  410 श्रीलंकन ​​रुपये दराने मिळेल. कपात करण्यापूर्वी पेट्रोलची 450 रुपये या दरानं विक्री केली जात होती.  (petrol rate sri lanka government has cut the price of petrol by rs 40 per liter)

पेट्रोलपेक्षा डीझेल महाग

सरकारच्या या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. श्रीलंकेत डिझेलची किंमत अजूनही 430 श्रीलंकन ​​रुपये प्रति लीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा माल एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये डिझेलचा वापरही जास्त आहे.

कुणाला दिलासा कुणाला धक्का?

पेट्रोलच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना थेट दिलासा मिळणार असला तरी व्यापाऱ्यांच्या अडचणी मात्र कायम आहेत. अशा लोकांसाठी डिझेलच्या दरात कपात न करणे म्हणजे धक्का बसण्यासारखे आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतर लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही सरकारी किंमतीच्या पातळीनुसार पेट्रोलच्या दरात कपात करणार असल्याचे सांगितले आहे. 

श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात असून येथील महागाई ऐतिहासिक पातळीवर आहे. ऑगस्टमधील 64.3% वरून सप्टेंबरमधील महागाई वाढून 69.8% झाली. डिझेलच्या दरात कपात झाल्यास महागाईवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीलंका सरकारने पेट्रोलच्या किमतीवरच दिलासा दिला आहे.