Imran khan विरोधात वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Updated: Oct 1, 2022, 10:43 PM IST
Imran khan विरोधात वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शनिवारी इस्लामाबादच्या दंडाधिकाऱ्यांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. महिला न्यायाधीशांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी (Pakistani media) ही माहिती दिली आहे.

इस्लामाबादच्या मरगल्ला पोलीस ठाण्याच्या (Margalla police station) न्यायदंडाधिकार्‍यांनी 20 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या एका प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी (Judge Jeba Chowdhury) यांना धमकावल्याबद्दल पीटीआय प्रमुखाविरुद्ध वॉरंट जारी केले आहे, असे पाकिस्तानच्या जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.

एफआयआरमध्ये पाकिस्तान दंड संहिता (PPC), 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 189 (लोकसेवकाला धमकी) आणि 188 (सार्वजनिक सेवक) या चार कलमांचा समावेश आहे.