नवी दिल्ली : उठसूठ पाकिस्तानकडे बोट दाखवणारं भारत सरकार पाकिस्तानकडून हा धडा घेणार का ?
पेट्रोल, डिझेलचे चढे दर
कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर वाढल्याचे सांगत आपल्याकडे
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत. हे इतकं नित्याचंच झालंय की नागरिकांनासुद्धा ते पटतं, त्यात काही वावगं वाटत नाही. सध्या आपल्याकडे पेट्रोल ७७.९४ रु प्रति लिटर तर डिझेल ६३.४३ रु प्रति लिटर या दराने मिळतय.
स्वत:चंच कौतुक
आपल्या शेजारच्या पाकिस्तान, नेपाल, बांगलादेश, श्रीलंका या राष्ट्रांपेक्षा आपण प्रगत आहोत. वेळोवेळी त्याबद्दल आपण स्वत:चीच पाठही थोपटून घेत असतो. पण काही बाबतीत मात्र आपणच त्यांच्याकडून धडा घेण्याची आवश्यकता आहे.
मागासलेले पण स्वस्त
शेजारच्या या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर किती आहेत हे लक्षात घेतल्यावर आपण तोंडातच बोटं घालतो. पाकिस्तानात पेट्रोल ४२.१४ रुपये, श्रीलंकेत ५३.४७ रुपये तर बांगलादेशमध्ये ६९.९१ रुपये आहे. या सर्व देशांमधले दर भारतातल्या दरांपेक्षा खूपच कमी आहेत.
दरांची तुलना करणारा तक्ता सोबत दिला आहे,
देश पेट्रोल डिझेल (रुपये प्रति लिटर)
भारत 77.94 63.43
पाकिस्तान 42.14 46.93
श्रीलंका 53.47 39.69
नेपाल 61.24 46.24
भूतान 62.21 56.05
बांगलादेश 69.91 51.05
त्यांना जमतं आपल्याला का नाही
जर हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले देश जर कमी दरात पेट्रोल, डिझेल पुरवू शकत असतील तर आपण का नाही. येताजाता पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश करणारं भारत सरकारने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.