तर पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढणार

कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. परंतु आता अशी बातमी येत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची समस्या वाढू शकते. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 01:57 PM IST
तर पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढणार title=

नवी दिल्ली : कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. परंतु आता अशी बातमी येत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची समस्या वाढू शकते. 

तेलाचे दर वाढणार

ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) ने 2018 च्या अखेरपर्यंत तेल उत्पादनात कपात करण्याचे ठरविले आहे. याचा उद्देश तेलाच्या दरात सतत होणारी घसरण रोखणे असा आहे. याचा अर्थ येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढू शकतात. त्यानंतर, भारतात सध्या उपलब्ध असलेले पेट्रोल आणि डिझेल किमान 5 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. भारतात, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर याचा प्रभाव निश्चितपणे दिसणार आहे. विएनामधील ओपेकच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झालं.

कच्च्या तेलाची किंमत 60 डॉलर प्रति बॅरल

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 60 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढली आहे. यूएसए उत्पादन कपात कमी करण्याच्या करारामध्ये नाही आहे. रशियाला भीती वाटते की उत्पादन कपातमुळे तेलची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिका येथे उत्पादन कर वाढवणार तर नाही.

तर दर वाढणार हे निश्चित

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर नियंत्रित करण्याच्या या प्रयत्नाला किती यश मिळतं हे संपूर्ण ओपेक सदस्य देश आणि गैर-ओपेक सदस्य देशांवर अवलंबून आहे. जर दोन्ही पक्ष या बाबीवर सर्वसंमती दर्शवतात तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढणार हे नक्की आहे.