अँजेलिना जोलीसारखं दिसण्याची हौस पडली महागात...

सुंदर दिसण्यासाठी मुली काय नाही करत ? 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 1, 2017, 12:25 PM IST
अँजेलिना जोलीसारखं दिसण्याची हौस पडली महागात... title=

नवी दिल्ली : सुंदर दिसण्यासाठी मुली काय नाही करत ? ब्युटी पार्लरमध्ये जाणे, ब्युटी प्रॉडक्स वापरणे, इतकेच काय तर अगदी घरगुती उपाय देखील करतो. त्यापुढे जात काहीजणी प्लास्टीक सर्जरीचा आधार घेतात. मात्र नेहमीच ही सर्जरी यशस्वी होतेच असे नाही.

अँजेलिना जोलीसारखं दिसण्याची इच्छा

असेच काहीसे इराणच्या सहर तबार १९ वर्षांच्या मुलीसोबत झाले. तिला हॉलीवुड अॅक्‍ट्रेस अँजेलिना जोलीसारखं दिसण्याची खूप इच्छा होती. मात्र त्या नादात तिने आपले रूप बिघडवले.

अँजेलिना जोली खूप मोठी फॅन असून तिला काहीही केल्या तिच्यासारखे दिसायचे होते. त्यासाठी तिने प्लास्टीक सर्जरी केली. सहरने एका मुलाखतीत सांगितले की, तिने डाएट करून ४० किलो वजन केले. आतापर्यंत तिने ५० हून अधिक सर्जरीज केल्या आहेत. अनेकदा तिचा जीव जाण्यापासून वाचला आहे. 

woman went under 50 surgery to look like Angelina jolie see pics

चुक उमगली

आता तिला तिच्या चुका जाणवत आहेत आणि इतरांनी त्या करू नये म्हणून ती स्वतःचे उदाहरण सर्वांसमोर ठेवत आहे. तिने शेअर केलेले सेल्‍फीज पाहून लोक तिची चेष्टा करतात. तिला कार्टून म्हणून संबोधतात. 

woman went under 50 surgery to look like Angelina jolie see pics