मुंबई : फक्त स्वभावच नव्हे, तर तुमच्या शरीरातील अवयवांपासून अगदी तुमच्या चालण्याबोलण्याची आणि बसण्याची पद्धतही लगेचच तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही कसा विचार करताय याबाबतचं गुपित उघड करते.
हो, बरोबर वाचलं तुम्ही. बसण्याची पद्धतही तुमच्याबद्दलची गुपितं उघड करते. बसल्यानंतर तुम्ही पायांची रचना कशी ठेवता यामुळं ही रहस्य समोर येतात. धोका, असहजता, नैराश्य, भीती अशा अनेक प्रकारच्या मानसिक स्थितींकडे इथूनच लक्ष वेधलं जातं. (Personality Test sitting position will reveal your thought process)
चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही पहिल्या पद्धतीत बसता, अर्थात तुम्ही गुडघे सरळ ठेवून बसत असाल तर तुम्ही स्वत:च्या कौशल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक आहेत. काही बाबतीत मात्र तुमच्या मनात काहीतरी गमावण्याचीही भीती असते.
तुम्ही चित्रात दाखवलेल्या दुसऱ्या पद्धतीप्रमाणे म्हणजे पाय पसरवून बसत असाल, तर तुमचा स्वभाक काहीसा संतप्त आणि तर्क लावणारा असू शकतो. काहीतरी चुकीचं होणार नाही ना याचीच भीती तुम्हाला सतत सतावत असते.
बसलं असताना तुम्ही पाय एकावर एक ठेवून, म्हणजेच चित्रात दाखवलेल्या तिसऱ्या पद्धतीनं बसत असाल, तर तुमच्याकडे चौकटीबाहेरच्या कल्पनांचं भांडार असतं. तुमच्यावर कल्पनाशक्तीचा वरदहस्त असतो.
पाय एकमेकांत गुंतवून म्हणजेच चित्रातील चौथ्या पद्धतीत तुम्ही बसता का? तर तुम्ही प्रसन्न, मितभाषी आणि तितकेच समजुतदार आहात. स्वाभिमान जपताना कुठेही तुम्ही गर्वाच्या वाटेवर जात नाही. आजुबाजूला असलेल्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही तुम्ही कारणीभूत ठरता.
पाचव्या पद्धतीप्रमाणे म्हणजेच एक पाय वर करुन तुम्ही बसता का? तर तुमच्यामध्ये कमाल नेतृत्त्वक्षमता असते. अनेकदा तुम्ही निवांत असता, येणारं प्रत्येक आव्हान तुम्ही शांततेनं झेलता, सामोरं जाता आणि जिंकता. स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही स्वत:ला झोकून देता.
काय मग? तुमच्याबद्दल जे लिहिलंय ते खरंय ना?