VIDEO : विमानात ताजी हवा खाण्यासाठी महिलेने उघडली खिडकी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Sep 29, 2019, 11:19 AM IST
VIDEO : विमानात ताजी हवा खाण्यासाठी महिलेने उघडली खिडकी  title=

मुंबई : एखाद्या माणूस कोणत्या प्रसंगाला कसं वागेल याचा काही नेम नाही. आणि मग हे वागणं कधी अनोखं असेल तर ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्याशिवाय राहत नाही. तर झालं असं की, बीजिंगमधील एका महिलेचा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसावं की रडावं हे कळणार नाही. 

विमानात बसल्यानंतर आपल्याला ताजी हवा खायची या उद्देशाने महिलेने केलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. या महिलेचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे आणि आता तो व्हिडिओ अनेकांच मनोरंजन करत आहे. 

या व्हिडिओत आपण पाहू शकतो, एका महिलेने ताजी हवा खाण्यासाठी विमानातील खिडकी चक्क उघडी ठेवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये देशांतर्गत फिरण्यासाठी Xiamen Airlines चा वापर केला जातो. ही महिला यामधून प्रवास करत आहे. 

सीटवर बसल्यावर तीला गुदमरल्यासारखे वाटू लागले. विमानाबाहेरील ताजी हवा घेण्यासाठी विमानाचा आपातकालीन दरवाजा उघडला. त्यावेळी सुदैवाने विमान हे रन-वेवरच होते. शेजारच्या व्यक्तीने असू करू नको असे सूचवूनही महिला ऐकली नाही. अखेर विमानातील कर्मचाऱ्यांना याबाबत पोलिसांना माहिती द्यावी लागली. पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेतले पण या सगळ्या प्रकारात विमान उड्डाणाला एक तास उशिर झाला.