लंडन : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयाचा विरोध करत आहे. पाकिस्तानकडून या मुद्द्यावर सतत कुरापती सुरु आहेत. आपलं समर्थन करावं म्हणून पाकिस्तान इतर देशांपुढे हात पसरवत आहे. पण कोणत्याच देशाने पाकिस्तानचं समर्थन केलेलं नाही. उलट अनेक मुस्लीम देशांनी भारताच्या या निर्णय़ाचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानच्या समर्थकांनी काही दिवसांपूर्वी परदेशात भारताच्या या निर्णयाचा विरोध करत विरोध प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर पुन्हा लंडनमध्ये भारतीय दुतावासासमोर पाकिस्तानच्या समर्थकांनी विरोध प्रदर्शन केलं. पण यावेळी त्यांनी इमारतीवर दगडफेक देखील केली.
#WATCH United Kingdom: Pakistani supporters protested outside the Indian High Commission in London yesterday. They also caused damage to the premises. (Video Source: Indian High Commission in London) pic.twitter.com/dFtm7C64XO
— ANI (@ANI) September 4, 2019
भारतीय दुतावासासमोर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी जमले होते. त्यांनी अनुच्छेद 370 हटवल्याने भारतविरोधी घोषणा दिल्या. यादरम्यान इमारतीवर दगडफेक देखील केली. यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून हटवलं.
Another violent protest outside the Indian High Commission in London today, 3 September 2019. Damage caused to the premises. @foreignoffice @UKinIndia @MEAIndia @DominicRaab @DrSJaishankar @PMOIndia @tariqahmadbt pic.twitter.com/2sv0Qt1xy8
— India in the UK (@HCI_London) September 3, 2019
पाकिस्तानी समर्थकांच्या या कृत्याची माहिती भारतीय दुतावासाने ट्विट करुन दिली आहे. ज्यामध्ये इमारतीच्या काचा फुटलेल्या दिसत आहे.