Optical Illusion: फोटोमध्ये आधी काय दिसलं? लक्षपूर्वक पाहा; चुकीच्या उत्तरानं तुमचंच नुकसान

फोटो अगदी व्यवस्थितच पाहा....   

Updated: May 16, 2022, 08:00 AM IST
Optical Illusion: फोटोमध्ये आधी काय दिसलं? लक्षपूर्वक पाहा; चुकीच्या उत्तरानं तुमचंच नुकसान  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Optical Illusion Viral Photo: दर दिवशी नव्यानं काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे फोटो म्हणजे Optical Illusion . तुम्हीही आतापर्यंत असे फोटो पाहिले असतील, ते अगदी तीक्ष्ण नजरेने पाहिलेही असतील. पण, या फोटोंतून तुम्ही कधी काही शिकला आहात का? 

सध्या एक असाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Optical Illusion ) याच प्रकारातील हा फोटो. यामध्ये दिसण्याऱ्या गोष्टी स्पष्टपणे नजरेतही येतात. पण, खरा ट्विस्ट तर पुढे आहे. कारण, या फोटोवजा चित्रामध्ये नेमकं काय दडलंय हे सांगण्यावरूनच तुमच्या व्यक्तीमत्त्वाचं मोठं गुपित समोर येत आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) च्या या नव्या फोटोमध्ये तुम्हाला एक चित्र काढणारा मुलगा दिसत असेल. त्याच्या मागे पर्वत, झोपडी, हिरवं गवत, वृक्ष आणि उडणारे पक्षीही दिसत आहेत. पण, हे संपूर्ण चित्र एका नजरेत जर तुम्ही पाहिलंत तर तुम्हाला एक नजर रोखलेला चेहरा स्पष्ट दिसेल. 

पहिल्या नजरेत तुम्हाला काय दिसलं? 
योर टँगो (Your Tango) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या ऑप्टीकल इल्यूजनच्या फोटोतून तुम्ही सर्वाधिक कोणाला घाबरता याची माहिती देण्यात आली आहे. हा रहस्यमयी फोटो पाहताना त्यामध्ये एक व्यक्ती चित्र काढताना दिसत आहे. 

ओलेग शुप्लियाक (Oleg Shupliak) ची प्रसिद्ध कलाकृती असणारं हे चित्र संपूर्ण जगाला भांबावून सोडत आहे. जर, या चित्रात तुम्हाला एका लहान मुलासोबतच एका व्यक्तीचा मोठा चेहरा दिसत आहे तर, तुमचा स्वभाव एककेंद्री आणि उत्साही आहे. 

सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोन 
वरील गोष्टी सर्वात आधी तुम्हाला आढळल्यास, तुम्ही वर्तमानात जगणाऱ्यांपैकी एक आहात. मोठ्या चेहऱ्यातून असेच सकारात्मक पैलू समोर येत आहेत. नकारात्मक दृष्टीकोन असा की तुम्ही भावनात्मकरित्या कमकुवत व्यक्ती म्हणून जगासमोर येण्यास घाबरता. 

वाद आणि असहमतीनंतर तुम्ही शांत होता, मोठ्या तंट्यापासून तुम्ही दूर राहता. आनंदी लोकांच्या गराड्यात राहणं तुम्हाला आवडतं. व्यक्तीमत्त्वाचे हे पैलू एक चित्र उलगडतं हे कौतुकच, नाही का?