डेल्टा वेरिएंटने जगाची चिंता वाढवली; वेगाने पसरतोय नवा वेरिएंट

भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. 

Updated: Jun 26, 2021, 10:11 AM IST
डेल्टा वेरिएंटने जगाची चिंता वाढवली; वेगाने पसरतोय नवा वेरिएंट title=

मुंबई : भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांच्या म्हणण्याप्रमाणे, भारतात पहिल्यांदा सापडलेल्या हा डेल्टा वेरिएंट आतापर्यंत सर्वात जास्त संसर्ग पसरवणारा प्रकार आहे. हा डेल्टा वेरिएंट कमीत कमी 85 देशांमध्ये पसरला असल्याचा इशाराही यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जगभरात वेगाने पसरतोय हा डेल्टा वेरिएंट

शुक्रवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर तेद्रोस आधानोम घेबरेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितलं की, गरीब देशांमध्ये लस नसल्यामुळे डेल्टा वेरिएंटच्या प्रसारास मदत होते. श्रीमंत देशांना विकसनशील देशांना त्वरित लस द्यायची इच्छा नाही. तर गरीब देश त्यांच्याकडे लसी नसल्यामुळे निराश झाले आहेत.

युनायटेड किंगडममध्ये, कोरोनाच्या डेल्टा वेरिएंट संसर्गाच्या 35,204 नव्या घटनांची गेल्या आठवड्यात नोंद करण्यात आली आहे गेली. यासह, डेल्टा वेरिएंटमुळे संक्रमित होणाऱ्याची एकूण संख्या 1,11,157 वर गेली आहे. 

शुक्रवारी साप्ताहिक आकडेवारी जाहीर करताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका आठवड्यात डेल्टा वेरिएंटच्या प्रकरणांमध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा हा डेल्टा प्रकार भारतात प्रथम सापडला होता.

दरम्यान भारतातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची 50 प्रकरणं आतापर्यंत सापडली आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आढळली आहेत. आतापर्यंत राज्यात 20 रुग्ण आढळले आहेत. तर मध्य प्रदेशात 7 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे