नवी दिल्ली : २०१५ च्या भूकंपानंतर जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'ची उंची पुन्हा एकदा संयुक्तपणे मोजण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळनं धुडकावलाय.
भारतातील अडीचशे वर्ष जुन्या असलेल्या 'सर्व्हे ऑफ इंडिया'नं संयुक्तपणे वैज्ञानिक अभ्यास करून एव्हरेस्टची उंची मोजण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव नेपाळनं फेटाळलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, नेपाळच्या या निर्णयामागे चीनचा हात असू शकतो. नेपाळच्या म्हणण्यानुसार, चीनकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही... तर एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम हा देश स्वत:च करणार आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगेमधील सर्वात उंच असणाऱ्या या शिखराची उंची ८,८४८ मीटर आहे. परंतु, २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर एव्हरेस्टच्या उंचीविषयी वैज्ञानिकांमध्ये संशय आहे. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या ७.८ रिश्टर स्केल भूकंपात जवळपास ८००० जणांनी जीव गमावला होता... तर लाखो बेघर झाले होते.