इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाजरा मोटरवे महामार्गातल्या दोन टप्प्यांचं उद्घाटन केलं.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या लोरा चौकात पंतप्रधान अब्बासींनी त्याचं उद्घाटन केलं. हाजरा मोटरवे हा महत्त्वाकांक्षी चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पातला बांधून झालेला पहिला महामार्ग आहे.
चीनच्या गेझोबा महामंडळ आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एकत्रितपणे या महामार्गाचं बांधकाम केलं आहे.
सुमारे 40 किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी हाजरा महामार्ग उत्तरेला काराकोरम महामार्गाला जोडला जाणार आहे.