नाटोकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा, न्युयॉर्क टाइम्सचा दावा

Russia Ukraine War : रशिया - युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर विरोध करणाऱ्या देशांना  रशियाकडून इशारा देण्यात आला होता. रशियाने इशारा देताना जे युक्रेनच्या मदतीला येतील, त्यांच्यावर हल्ले चढविले जातील, अशी तंबी दिली होती. 

Updated: Mar 7, 2022, 08:18 PM IST
नाटोकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा, न्युयॉर्क टाइम्सचा दावा title=

मॉस्को :  Russia Ukraine War : मास्को : नाटोने युद्धात प्रत्यक्ष उतरण्यास नकार दिला असला तरी युक्रेनला शस्त्र पुरवठा मात्र केला जातोय. गेल्या एका आठवड्यात युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून जवळपास 17 हजार अँटी टँक शस्त्र पुरवण्यात आली आहेत. असा दावा न्युयॉर्क टाईम्सने केलाय. यात जॅव्हेलीन मिसाईल्सचा समावेश आहे. ही मिसाईल्स पोलंड-रोमानियाच्या सीमेवर उतरवण्यात आली होती. (NATO supplies arms to Ukraine, claims New York Times)

रशिया - युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर विरोध करणाऱ्या देशांना  रशियाकडून इशारा देण्यात आला होता. रशियाने इशारा देताना जे युक्रेनच्या मदतीला येतील, त्यांच्यावर हल्ले चढविले जातील, अशी तंबी दिली होती. आता तर रशियाने "शत्रू देशांची" यादी जारी केली आहे. (Russia's list of hostile countries) या यादीत अमेरिका, इटलीसह 17 देश आहेत. युक्रेनमधील युद्धासाठी रशियावर इटलीने निर्बंध लागू केले आहेत.

रशियन सरकारने सोमवारी मंजूर केलेल्या या यादीमध्ये अमेरिका,  यूके, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड तसेच युक्रेनचा समावेश आहे. रशियन सरकारच्या आदेशानुसार, कोणतीही राज्ये, व्यवसाय आणि नागरिक जे काळ्या यादीत समावेश केला तर परदेशी कर्जदारांचे कर्जदार आहेत ते त्यांचे कर्ज रूबलमध्ये भरण्यास बांधिल असतील, असे म्हटले आहे.

रशियानं त्यांच्याविरोधात गेलेल्या देशांची अर्थात दुश्मन देशांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह 17 देशांचा समावेश आहे. या देशांनी रशियाविरोधात भूमिका घेतल्यानं या सगळ्या देशांची नावे रशियाने दुश्मन यादीत टाकली आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धात भारत तटस्थ राहिला. भारत तटस्थ राहिल्याबद्दल रशियाने भारताचे आभार मानले आहेत.