नासा खरेदी करणार चंद्रावरील माती, पण करणार काय?

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (American Space Research Organization) ‘नासा’ (NASA) आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती ( moon dirt ) खरेदी करणार आहेत. 

Updated: Dec 5, 2020, 06:43 PM IST
नासा खरेदी करणार चंद्रावरील माती, पण करणार काय? title=

प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (American Space Research Organization) ‘नासा’ (NASA) आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती ( moon dirt ) खरेदी करणार आहेत. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट ( private companies) देण्याची घोषणा संशोधन संस्थेकडून करण्यात आली. 

नासा चंद्रावरील माती खरेदी करते हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे वास्तव आहे. काही खासगी कंपन्या चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी २०२२ आणि २०२३ मध्ये मानवविरहित मोहिमा राबविणार आहे. यामाध्यमातून चंद्रावरील माती आणि खडकावरील पापुदऱ्यांचे नमुने गोळा करण्यात येतील. हीच माती नासा खरेदी करणार आहे. मातीची किंमत असेल २५ हाजर डॉलर म्हणजे २० लाख रुपये. 

चंद्रावरील मातीला सोन्याचा भाव  

- माती गोळा करण्यासाठी एक ते पंधरा हजार डॉलरचं कंत्राट 
- खासगी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा 
- ‘लुनार आऊटपोस्ट ऑफ गोल्डन कोलोरॅडो’
- टोकियोतील ‘आयस्पेस जपान’, लक्झेमबर्ग येथील ‘आयस्पेस युरोप’, कॅलिफोर्नियामधील ‘मास्टन स्पेस सिस्टिम मोजावे’ या कंपन्यांना कंत्राटे

भविष्यामध्ये या उपग्रहावरील खनिज संशोधनाला देखील गती मिळू शकते, असे भाकीत संशोधकांनी वर्तविले आहे. केवळ २५ हजार डॉलरमध्ये आम्हाला चंद्रावरील मातीचे नमुने मिळतील ही कल्पनाच नावीन्यपूर्ण आहे. असं नासाच्या कमर्शिअल स्पेस फ्लाइट डिव्हिजनच्या संचालकांनी सांगितलं. दुसरीकडे अंतराळात व्यापाराच्या दृष्टीने पाहिले पाऊल असल्याचं भारतातील तज्ज्ञ सांगतात. नेहरु तारांगण संचालक अरविंद परांजपे यांनीही यावर भाष्य केले आहे. मै तुम्हारे लिये चाँद लाकर दुंगा. म्हणणाऱ्यांना आता संधी आहे चंद्र नाही तर किमान त्यावरील माती तरी आणण्याची.