NASA Shared Moonrise Photo : पृथ्वीपासून साधारण 208 मैल म्हणजेच जवळपास 408 किमी अंतरावर असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून प्रत्येक लहानमोठी माहिती नासा सातत्यानं देत असते. National Aeronautics and Space Administration (NASA) कडून अवकाशाचे विविध रंग आजवर जगासमोर आणण्यात आले असून, एखाद्या ग्रहाच्या उत्पत्तीपासून त्या ग्रहाचा ऱ्हास होईपर्यंत आणि एखाद्या आकाशगंगेचं वय जाणून घेईपर्यंतची अनेक संशोधनं नासासं आजवर केली आहेत.
अवकाश क्षेत्रातील प्रत्येक प्रगतीच्या वाटेवर नासाचं महत्त्वाचं योगदान असून, याच संस्थेनं आता एक अद्भूत दृश्य जगासमोर आणलं आणलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पृथ्वीवर स्पेस स्टेशनवरून दिसणार एक कमाल दृश्य नासानं नुकतंच शेअर केलं आहे. "unique vantage point" असं लिहित स्पेस स्टेशनमधून टीपलेला हा फोटो पाहताना क्षितीजाच्या विविधरंगी छटा मन मोहताना दिसत आहेत.
नासानं दिलेल्या माहितीनुसार Matthew Dominick या अंतराळवीरानं हा फोटो टीपला असून, जवळपास चार महिन्यांपासून तो स्पेस स्टेशनवर वास्तव्यास आहे. मॅथ्यूनं टीपलेल्या या फोटोमध्ये अतिशय सुरेख आकारीचे एक बारीकशी चंद्रकोर पृथ्वीच्या वातावरणापासून काहीशी दूर अंतरावर असल्याचं पाहायला मिळ आहे. पृथ्वीवरील महासागर दर्शवणारा भागही फोटोमध्ये दिसत असून, काळ्याकुट्ट अवकाशामध्ये चंद्राची नाजूक कोर उठून दिसत आहे.
हे दृश्य प्रत्यक्षात पाहताना अंतराशवीरानं केलेलं वर्णनही इतकं कमाल आहे, की ते वाचताना या अंतरावीराच कवीमनही जागं झाल्याचं पाहायला मिळालं. "A sliver of a moon rises out of noctilucent clouds and appears to look towards the horizon awaiting the imminent sunrise." इतक्या सुंदर शब्दांमध्ये मॅथ्यूनं या क्षणाचं वर्णन केलं आहे. तुम्ही या फोटोला काय कॅप्शन द्याल?