NASA News : अंतराळ, विश्व, आकाशगंगा, महासागर या आणि अशा अनेक गोष्टींबाबत असणारं कुतूहल जाणत अमेरिकन अवकाश संस्था नासानं बऱ्याच अशा गोष्टी प्रकाशात आणल्या. अशाच आणखी एका रहस्याचा उलगडा नासानं नुकताच केला. जिथं NASA कडून अंटार्क्टिक खंडातील 'डिसेप्शन आयलंड'चा अविश्वसनीय फोटो शेअर करण्यात आला.
आश्चर्याची बाब म्हणजे हा जगातील एकमेव असा ज्वालामुखी आहे, जिथं थेट पोहोचता येतं. नासानं सोशल मीडियावर याच ज्वालामुखीचा फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये अतिशय रंजक माहिती दिली.
'हा आहे समुद्राच्या निळ्याशार पाण्यानं वेढलेल्या डिसेप्शन आयलंडचा फोटो. या बेटावर लहान पर्वत आहेत, टेकड्या आहेत काही डोंगरांवर बर्फही आहे. इथं खालच्या बाजूला एक असं स्थान आहे जिथून थेट या बेटावर पोहोचता येतं.' नासानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ज्वालामुखीच्या वरील भाग अगदी स्पष्टपणे दिसत असून, अंटार्क्टिकमधील दोन सक्रिय ज्वालामुखी या डिसेप्शन आयलंडवर असल्याचं सांगण्यात येतं. 19 व्या शतकापासून या ज्वालामुखीचा उद्रेक साधारण 20 हून अधिक वेळा झाला आहे.
समुद्रातही सक्रिय असणारा हा ज्वालामुखी पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा विषय राहिला आहे. दरवर्षी इथं साधारण 15 हजारांहून अधिक पर्यटकांची ये-जा असते. दुसऱ्या महायुद्धापासून हा ज्लावामुखी आणि हे बेट अनेकांच्या नजरेत आलं. त्यावेळी याचा वापर आयलंड व्हेल आणि सील माशांच्या शिकारीसाठी केला जात होता. अनेश संशोधकांनीही या भागात येत विविध विषयांवरील संशोधन केलं आहे.
NASA कडून James Webb दुर्बिणीच्या सहाय्यानं अशा अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या गेल्या आहेत ज्या सर्वसामान्य नजरेतून पाहता येणंही शक्य नसतं. पण, थेट अवकाशातील ग्रह, तारे, ताऱ्यांच्या हालचाली, त्यांचा जन्म अशा अनेक घटना नासामुळं आपल्यापर्यंत पोहोचल्या.