अंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर

माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल आणखीनच वाढत जातं...

Updated: Nov 1, 2017, 11:32 AM IST
अंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर  title=

मुंबई : माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल क्षमण्याऐवजी आणखीनच वाढत जातं...

असंच आता पुन्हा एकदा घडलंय. अवकाशात काय काय असेल? अंतराळात जीवसृष्टी कशी जगते? तिथली दृश्य कशी दिसत असतील? कसे आवाज येत असतील? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात... यातल्या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यात 'नासा' या अमेरिकेतल्या अंतराळ संस्थेला यश आलंय. 

अंतराळात कसे आवाज येतात? याची माहिती देणारे २२ ऑडिओ टेप नासानं जाहीर केलेत. या आवाजांत शनी आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचेही आवाज येतात. हे अंतराळातले आवाज भयाण वाटतात.