न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.
अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. न्युयॉर्कच्या लोअर मॅनहटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरिअलजवळ एका ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या नागरिकांना चिरडले. यात ८ लोकांचा मॄत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा दहशतवादी हा २९ वर्षांचा आहे. हल्ला केल्यानंतर तो पळून जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हल्लेखोराजवळ एक नकली बंदुक आणि एक पॅलेट गन आढळली. काही प्रत्यक्षदर्शींनी फायरिंगचा आवाज ऎकल्याचेही सांगितले. हल्ल्यानंतर त्यांनी आयएसला मिडिल ईस्ट आणि प्रत्येक ठिकाणी हरवल्यानंतर आता त्यांना अमेरिकेत घुसखोरी करू देणार नाही. या हल्ल्यातील पीडितांच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि संपूर्ण अमेरिका त्यांच्यासोबत आहे'.