Myths and Facts : Lawyer काळा कोट का घालतात, माहित आहे का कारण?

Lawyer काळा कोट घालण्यामागचे कारण जाणून घ्या एका क्लिकवर

Updated: Dec 10, 2022, 02:40 PM IST
Myths and Facts : Lawyer काळा कोट का घालतात, माहित आहे का कारण? title=
Myths and Facts Why do lawyers wear black coats do you know the reason nz

Black Lawyer Coat Myths and Facts : वकिल (Lawyer) आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वकिल न्यायालयात एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात. पण तुम्ही अनेकदा चित्रपटात (Movies) किंवा वास्तविक जीवनात काळा कोट घातलेले वकील पाहिले असतील. वकिलांना पाहून तुमच्या मनात विचार आला असेल की ते काळा कोट का घालतात? ते परिधान करण्यामागचे कारण आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. (Myths and Facts Why do lawyers wear black coats do you know the reason nz)

 

काळा कोट घालणे कधीपासून सुरू झाले?

इतिहासानुसार वकिलीची सुरुवात 1327 मध्ये झाली. त्यावेळेस न्यायाधीशांसाठी वेगळाच प्रकार असायचा. त्या वेळी वकिलांना काळा कोट घालण्याची गरज नव्हती. त्यावेळी वकील लाल रंगाचे कपडे आणि तपकिरी गाऊन घालायचे. 1600 नंतर वकिलांचा ड्रेस कोड (Dress code) बदलण्यात आला. न्यायाधीशांबद्दल बोलायचे झाले तर ते पांढरे केस असलेले विग घालायचे. 1637 मध्ये एक प्रस्ताव आला होता ज्यानुसार न्यायाधीश आणि वकिलांना सामान्य लोकांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काळा ड्रेस कोड घालण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर वकिलांनी फुल लेन्थ गाऊन घालायला सुरुवात केली आणि आजही तुम्हाला ते फक्त त्या ड्रेस कोडमध्येच दिसतील. हा ड्रेस कोड 1965 मध्ये भारतात अनिवार्य करण्यात आला होता. 

काळा कोट घालण्यामागेही हेच कारण आहे

काळा कोट शिस्त आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते, या कारणास्तव वकील भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये या ड्रेस कोडचे पालन करतात. याशिवाय, इंग्लंडचा राजा चार्ल्स II च्या मृत्यूनंतरही वकील आणि न्यायाधीशांना काळे कपडे घालण्याचे आदेश देण्यात आले होते. वकील काळा कोट घालतात. दुसरीकडे, जर आपण 1694 सालाबद्दल बोललो तर, क्वीन मेरीच्या मृत्यूनंतर, किंग विल्यमसन यांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी काळे गाऊन घालण्याचे आदेश दिले होते जेणेकरून ते सामान्य लोकांपासून वेगळे असतील. यासाठी वकिलांनीही काळा कोट परिधान करण्यास सुरुवात केली.