Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे.   

Updated: Mar 29, 2023, 10:32 AM IST
Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर  title=
Mukesh Ambani might geht defeated by chinese billionaire zhong shanshan to became Asias Richest Man

Mukesh Ambani News: गेल्या कैक वर्षांपासून (Reliance Group) रिलायन्स उद्योग समुहाची पाळंमुळं विविध क्षेत्रांत रुजताना दिसत आहेत. व्यवसाय क्षेत्रात या समुहानं उल्लेखनीय उंची गाठली आहे. नव्या पिढीच्या नव्या संकल्पनांच्या बळावर खुद्द मुकेश अंबानी यांनी त्यांच्या या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. याच कौशल्याच्या बळावर झालेल्या नफ्यामुळं मुकेश अंबानी यांचं नाव जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं गेलं. आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान आणि अग्रस्थानही त्यांनाच मिळालं. पण, आता मात्र त्यांच्या या स्थानाला धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी (ambani) अंबानींना तब्ब 10 अब्ज डॉलर्स इतकं नुकसान झालं आहे. मागील दोन दिवसांत कंपनीच्या शेअरची पडझड थांबलेली असली तरीही तुलनेनं वर्षभरात झालेला तोटा मात्र मोठा आहे. ज्यामुळं अंबानी  (Mukesh Ambani Networth) यांच्या एकूण संपत्तीच्या आकड्यातही काही बदल झाले आहेत. 

अंबानींची श्रीमंतांच्या यादीत घसरण 

ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सच्या यादीनुसार सध्या अंबानी जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 77.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. एकूण संपत्तीमध्ये 10.1 अब्ज डॉलर्सनं घट झाल्यामुळं ते आठव्या स्थानावरून थेट 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

अंबानींची जागा कोण घेणार? 

आतापर्यंत मुकेश अंबानी यांचं नाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घेतलं जात आहे. पण, लवकरच त्यांची जागा कुणी दुसरंच घेणार आहे. अंबानी यांच्यापासून दुसऱ्याच स्थानी चीनच्या सर्वात श्रीमंत उद्योगपती झोंग शैनशैन यांचं नाव आहे. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये तब्बल 788 मिलियन डॉलर्सनी वाढ झाली आहे. ज्यामुळं त्यांची संपत्ती 68.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अंबानी आणि झोंग यांच्या संपत्तीमध्ये 9 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. त्यामुळं ही दरी भरून निघाली तर अंबानी यांच्या जागी झोंग यांचं नाव घेतलं जाऊ शकतं.

हेसुद्धा पाहा : Kitchen Tips : चपाती वर्तुळाकारच का असते? जाणून घ्या यामागचं खरं कारण.... 

असं पहिल्यांदाच होणार नाहीये. कारण, 2020 मध्ये झोंग यांच्या संपत्तीचा आकडा अंबानींपेक्षा जास्त होता. पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नव्हता. 

कोण आहेत झोंग शैनशैन ? (zhong shanshan)

श्रीमंतीच्या बाबतीत अंबानींना टक्कर देणारे झोंग हे  Nongfu Spring  या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. तर, आशिया खंडातील ते दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधिश आहेत. त्यांच्या मागोमाग गौतम अदानी यांचं नाव येतं. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झोंग यांना 21 वं स्थान मिळालं आहे.