Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?

Morocco Earthquake News : संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना मोरोक्कोमध्ये काय सुरू होतं? या भूकंपाशी त्याचा काय संबंध? पाहून हैराण व्हाल!   

सायली पाटील | Updated: Sep 11, 2023, 07:35 AM IST
Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?  title=
morocco earthquake news death toll increasing why such calamities happen know reason

Morocco Earthquake News : जगावर येणारी संकटं काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीयेत. याचीच प्रतिची पुन्हा आली आणि निमित्त ठरलं ते म्हणजे मोरोक्को येथे आलेला भूकंप. संपूर्ण जगाला धडकी भरवणाऱ्या मोरोक्को येथील भूकंपानं आतापर्यंत हजारो बळी घेतले असून, मृतांचा आकडा 2100 च्याही पलीकडे पोहोचला आहे. शुक्रवारी आलेल्या हा महाविनाशकारी भूकंपात 2500 हून अधिक नागरिक जखमी अवस्थेत असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांकडून मिळत आहे. 

मोरोक्को येथे आलेला भूकंप इतका प्रचंड तीव्रतेचा होता, की तिथं क्षणात बदललेल्या चित्रानं विदारक परिस्थिती संपूर्ण जगासमोर आली. भूकंप येणानाची काही दृश्य सीसीटीव्हीमध्येही कैद करण्यात आली जिथं मोरोक्कोतील नागरिक जीव हातात घेऊन धाव मारताना दिसत होते. तिथं मोरोक्कोमध्ये जीवन- मृत्यूचा संघर्ष सुरु असतानाच आता या देशाला मदतीचा हात देण्यासाठी स्थानिक संस्थांसोबतच शेजारी राष्ट्रांनीही पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

 

लॉकडाऊन काळात संशोधन झालं आणि... 

23 जुलै रोजी जगभरातील 70 हून अधिक संशोधकांनी अकॅडमिक सायन्स जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित केला. ज्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत जगाचं लक्ष वेधण्यात आलं. निरीक्षणानुसार लॉकडाऊन काळात बाहेर सुरु असणारी अनेक कामं थांबल्यामुळं वैज्ञानिकांना लहानसहान धरणीकंपही सहजगत्या जाणवत होते. आतापर्यंतच्या दैनंदिनत जीवनात ते साध्य झालं नव्हतं. ज्यामुळं या काळात बरीच माहिती हाती आली. या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या भूकंपांची पूर्वसुचना मिळण्यासोबतच हजारो नागरिकांचे प्राण वाचवणंही शक्य होतं. सध्याच्या घडीला संपूर्ण जगात भूकंपांचं वाढतं प्रमाण पाहता या पूर्वसुचना मोठी मदत करणार आहेत. 

भूकंप येण्याची पूर्वसुचना वाचवणार अनेकांचा जीव 

डीडब्ल्यूच्या वृत्तानुसार भूकंपाची भविष्यवाणी करता येणं सहज शक्य आहे. संशोधनातूनच ही बाब समोर आली असून, यामध्ये 7 हून अधिक तीव्रता असणाऱ्या 90 भूकंपाबाबतचं संशोधन समोर आलं आहे. जिथं 3 हजार 26 उपग्रहांच्या माध्यमातून संशोधकांनी त्या संकेतांवर लक्ष केंद्रित केलं होतं जे भूकंप येण्याआधी निर्माण होत होते. अशाच पूर्वसुचना मिळाल्यास हजारोंचा जीव वाचू शकतो हेच यातून स्पष्ट झालं. 

भूकंप येण्याची प्रक्रिया समजून घेताना... 

पृथ्वीच्या उदरात साधारण सात पदर आहेत. यातील प्रत्येक पदर प्रत्येक क्षणी कार्यरत असतो. जिथं या प्लेट्स अर्थात हे पदर एकमेकांवर आदळता त्या भागाला फॉल्ट झोन असं म्हटलं जातं. पदरांच्या एकमेकांवर आदळण्यानं एक उर्जा निर्माण होते. यातून होणाऱ्या हालचालींनाच भूकंप म्हटलं जातं. भूकंपाचं केंद्र पृष्ठापासून जितकं जवळ, नुकसान तितकंच जास्त असं सोपं समीकरण इथं पाहायला मिळतं. हवामानात होणारा बदल फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागालाच नव्हे तर, अंतर्गत भागालाही प्रभावित करतो. ज्यामुळं पृथ्वीच्या उदरातील हालचाली वाढून भूकंपासारख्या आपत्ती येतात.