मार्क झुकरबर्ग बनणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती ?

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2017, 07:54 PM IST
मार्क झुकरबर्ग बनणार अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती ? title=

 फेसबुक चेअरमॅन आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारा मार्क झुकरबर्ग अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती होऊ शकतो.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने २०२० च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीही केली आहे. झुकरबर्गने यासाठी वरिष्ठ सल्लागार आणि रणनीती आखणाऱ्यांची निवडही केली आहे.

त्याचे मुख्य रणनीतीकार हे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचे सल्लागार आणि हिलरी क्लिंटन यांचे मुख्य रणनितीरकार होते. जर असे झाले तर झुकरबर्ग अमेरिकेचा सर्वात श्रीमंत राष्ट्रपती होऊ शकतो.

पण त्याने सध्या या शक्यतेला नाकारले आहे.

फॉर्ब्सच्या माहितीनुसार झुकरबर्गचे ७१ अरब डॉलर्सचे नेटवर्थ आहे. त्यामुळे तो जगातील श्रीमंतांच्या यादीत आहे.

झुकरबर्ग २०१७ मध्ये पूर्ण वर्ष अभ्यास दौऱ्यावर आहे. या दरम्यान तो देशातील ५० राज्यांमध्ये दौरे करुन प्रत्येक राज्यातील नेते आणि प्रमुखांना भेटणार आहेत. या दौऱ्याच्या डॉक्यूमेंटेशनचे काम बुश आणि ओबामा यांच्या निवडणुकीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या फोटोग्राफर चार्ल्स ओमैनींकडे ही कामगिरी आहे.