एकच विषारी वाईनचा प्याला अन् आयुष्याचा खेळ खलास..! तडफडून तडफडून झाले मृत्यू

कंबोडियामध्ये नुकतीच मोठी घटना घडली आहे.  येथे असंख्य लोकांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.

Updated: Jul 3, 2021, 12:48 PM IST
एकच विषारी वाईनचा प्याला अन् आयुष्याचा खेळ खलास..! तडफडून तडफडून झाले मृत्यू title=

कंबोडिया : कंबोडियामध्ये नुकतीच मोठी घटना घडली आहे.  येथे असंख्य लोकांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे जवळपास 30 लोकांचा तडफडून तडफडून जीव गेला आहे. 

दारू पिताच थरथर आणि तडफड 
मृतकांमधील एक असलेल्या प्रोम वन्नक नावाच्या व्यक्तीने थोडी दारू घेतली होती. त्यानंतर अचानक त्याला थकवा जाणवायला लागला. त्यानंतर त्याची हालत खराब झाली. त्याच्या बायकोने त्याला स्थानिक रुग्णालयात जाण्यास विनंती केली परंतु त्याने घरीच राहणे पसंत केले. अचानक  सकाळपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

अनेक लोकांचा मृत्यू
वन्नक यांच्यासह अनेकांचा विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेतील अनेकांचा मृत्यू तर अनेकजण रुग्णालयात भरती आहेत. पुरसॅट प्रांतात जूनच्या सुरूवातीला अशाच प्रकरणात 13 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 10 मे रोजी 12 लोकांचा  मृत्यू झाला.

तांदूळ आणि हर्बल वाईनच्या वापरावर बंदी
अशा परिस्थितीत पोलिसांनी तांदळाच्या वाइनवर बंदी आणली आहे. अशी दारू विक्री करणाऱ्या जवळपास 15 लोकांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानेही अशा प्रकारच्या दारूचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.