Video : लिफ्टमध्ये महिलेला एकटं पाहून नराधमाचं गैरवर्तन, तिला हात लावताच...

Viral Video : भय इथले संपत नाही...लिफ्टमध्ये तिला एकटं पाहून त्या नराधमाने तिच्यासोबत   दृष्कर्म केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2023, 12:41 PM IST
Video : लिफ्टमध्ये महिलेला एकटं पाहून नराधमाचं गैरवर्तन, तिला हात लावताच... title=
man touch woman inappropriately in lift video viral social media trending video

Viral Video : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून हृदयद्रावक घटना रोज समोर येत असतात. महिला आयोग, कडक कायदे आणि सक्षम पोलीस यंत्रणा असून अशा घटन्यांवर आळा बसत नाही आहे. नराधमाचे घाणेरडे आणि अश्लिल कृत्य सुरु आहे. सोशल मीडियावर महिलेसोबत गैरवर्तन करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये महिलेला एकटी पाहून तो नराधम तिच्यासोबत घाणरडे कृत्य करतो. (man touch woman inappropriately in lift video viral social media trending video)

भय इथले संपत नाही!

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता लिफ्टमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. लिफ्टमध्ये अजून कोणीही नाही हे पाहून तो नराधम महिलेच्या जवळ जातो. महिला आपल्या मोबाईलमध्ये काही तरी पाहण्यामध्ये व्यस्त असते. त्या पुरुषाला जवळ आल्याचं पाहून ती महिला लिफ्टच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहेत. 

तो पुरुष परत तिच्या पाठीमागे जाऊन उभा होतो. आता तर त्याची हिम्मत अजून वाढते तो तिच्या शरीराच्या पुढच्या भागाला अयोग्यारित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून महिला त्याचा हात झटकून देते आणि त्याला जोरदार थप्पड मारते. त्या नराधमाचं कृत्य पाहून तिचं तळमस्तकातील आग डोक्यात जाते आणि ती त्याला चांगलाच धडा शिकवते. 

स्त्रियांना कायम कमजोर मानलं जातं, आपण आजची स्त्री ही स्वत:चं रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्या महिलेने त्या नराधमाला जबरदस्त धुतले आहे. तो यानंतर कुठल्याही महिलेची अशी छडे काढणार नाही.

हा व्हिडीओ ट्विटर म्हणजे X वर Figen या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील महिलेच्या रौद्ररुपाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.