गळ्यात साप गुंडाळून बसमधून फिरणारा व्यक्ती

एखाद्या मास्क प्रमाणे साप गुंडाळलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Sep 17, 2020, 05:16 PM IST
गळ्यात साप गुंडाळून बसमधून फिरणारा व्यक्ती title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील राहणीमानात असंख्य बदल झाले आहे. प्रत्येक राष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक नियमांचा आणि पर्यायांचा वापर करत आहे. कोरोना काळातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मास्क. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांसाठी मास्क बंधनकारक केलं आहे. या काळात बाजारात देखील विविध प्रकारचे आणि ग्राहकांच्या पसंतीस खरे ठरतील असे मास्क विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु एका व्यक्तीने तर चक्क एखाद्या मास्क प्रमाणे मोठा साप तोंडाभोवती गुंडाळला आहे. 

सध्या एखाद्या मास्क प्रमाणे साप गुंडाळलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो इंग्लंडचा असल्याचं समोर येत आहे. इंग्लंड सरकारने देखील कोरोना टाळण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. जण कोणी मास्क घालणार नाही त्याच्या विरुद्ध सक्त कारवाई करणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. 

तरी देखील हा व्यक्ती मोकाटपणे मास्क न लावता बसमधून प्रवास करताना दिसत आहे. सर्व प्रथम हा मास्क असल्याचं लोकांना वाटलं. मात्र तो मास्कनसून साप असल्याचे बसमधील अन्य प्रवाश्यांच्या लक्षात आले. 

त्यामुळे हा प्रकार तात्काळ पोलिसांना कळवण्यात आला. आता या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीने मास्क ऐवजी सापाचा उपयोग का केला याचा देखील तपास पोलीस करत आहेत.