ब्रिटन: हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची हौस तर प्रत्येकाला असते. कधी कुटुंबासोबत तर कधी मित्र-मैत्रिणी तर कधी पार्टनरसोबत. तिथे बऱ्याचदा आपण खाण्याचा धुंदीत पैशांचा विचार करत नाही. मात्र हीच गोष्ट एका व्यक्तीला महागात पडली आहे. मित्रांसोबत हॉटेलमध्ये खायला गेलेल्या या व्यक्तींचं चक्क बँक बॅलन्स रिकामं झालं आहे. हॉटेलचं बिल पाहून या व्यक्तीला घाम फुटला मात्र पैसे भरण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
ब्रिटनमधील नुस्र-एट स्टीकहाउस या महागड्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकाने हॉटेलचं बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ग्राहक जेवण्यासाठी हॉटेलवर पोहचला तेव्हा त्याला माहित नव्हते की त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई एका दिवसात बिलासाठी लागणार आहे. लंडनच्या नुस्र-एट स्टीकहाउस 'सॉल्ट बे' चे नव्याने उघडलेले रेस्टॉरंट आहे. तिथे हा सगळा प्रकार घडला.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार एका व्यक्ती या हॉटेलमध्ये गेला. तेव्हा त्याला तिथे जेवणासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले. एवढेच नाही तर त्या ग्राहकाला भारतातील काही लोकांच्या पगाराइतका सेवा कर भरावा लागला. व्हायरल झालेल्या पावतीमध्ये हे पाहिले जाऊ शकते की ग्राहकाला £1,812.40 म्हणजेच जेवणासाठी एक लाख 80 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागले.
44 great british pounds for 4 redbulls… having a laugh. pic.twitter.com/xgzs8f2cEu
— Jamz (@jjamz_) September 26, 2021
बिलावरील सर्वात महाग अन्न जायंट टॉमहॉक होतं. ज्याची किंमत £630 रुपयात मोजायचे तर साधारण 62,800 रुपये होती. रेस्टॉरंटमध्ये फक्त चार रेड बुल्सची किंमत £ 44 रुपयांत मोजायचे तर साधारण 4400 रुपये एवढी किंमत होती. या व्यक्तीने आठ लोकांसाठी £236.40 एवढे रुपये मोजावे लागले म्हणजेच 23,400 रुपये हॉटेल बिलात भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर द्यावे लागल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सेवा शुल्क भरावे लागले. त्याच वेळी, कोका-कोलाच्या एका ग्लासची किंमत £ 9 पाऊंड होती.
लंडनमधील सर्वात महागड रेस्टॉरंट म्हणून हे ओळखलं जातं. ट्वीटर युझर जमील अमीन याने बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टला 10 हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत. या पोस्टवर लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.