वॉशिंग्टन: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान अनेक घटना घडत असतात. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी अपघात किंवा दुर्घटना घडताना कॅमेऱ्यात कैद होतात. असाच एक धक्कादायक प्रकार लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान समोर आला आहे. रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना त्याच्या मागे उभी असलेली कार अचानक तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. रिपोर्टिंग दरम्यानचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. असं कसं घडलं हा प्रश्न रिपोर्टलाही पडला होता. त्यालाही ही दृश्यं पाहून मोठा धक्का बसला.
अमेरिकेच्या संगामोन काउंटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली. संगमोनमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान, तलावाच्या कडेला उभी असलेली एक कार घसरली आणि तलावात बुडाली आणि ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमची संलग्न वेबसाइट WION मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, स्थानिक वृत्तवाहिनीचे रिपोर्टर जेकब इमर्सन एका लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान थेट अहवाल देत होता. तेव्हा त्यांच्या मागे उभी केलेली कार घसरून तलावामध्ये बुडाली. लाईव्ह रिपोर्टिंगच्या वेळी असं काही होऊ शकतं याची रिपोर्टरला कल्पना नव्हती.
— Brian Floyd (@BrianMFloyd) August 4, 2021
— Moon Bean (@wildwoodgrain) August 4, 2021
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका पांढऱ्या रंगाची कार रिपोर्टरच्या मागे उभी केलेली दिसत आहे. रिपोर्टिंग करताना कार हळू हळू आपणच तलावाच्या दिशेने सरकू लागते. लोक जेव्हा गाडीजवळ येतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत ती पाण्यात बुडून गेलेली असते.
कार तलावात बुडाली. मात्र, यादरम्यान, रिपोर्टरला याबाबत काहीच माहिती नाही. नंतर, जेव्हा तो त्याच्या मागे लोकांचा आवाज येतो तेव्हा तो तेव्हा तो मागे वळून पाहतो. मग त्याला घटनेची कल्पना येते. कार तलावामध्ये पडली तेव्हा कोणीही कारमध्ये बसले नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.