जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो

Updated: Jul 12, 2022, 04:18 PM IST
जंगलाच्या राजाही जेव्हा आजारी पडतो, चक्क सिटी स्कॅन करावं लागलं, पाहा फोटो title=

मुंबई :  जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या करायला सांगतात. त्या चाचणीवरून डॉक्टर नक्की काय झालंय ते शोधून काढतात. कधीकधी ते सिटीस्कॅन करायला सांगतात. पण प्राण्याचा आणि तेही सिंहाचा सिटीस्कॅन करावा लागला तर काय होईल? 

कधीकधी प्राण्यांना शरीराच्या अंतर्गत समस्या असतात, ज्याबद्दल ते सांगू शकत नाहीत. लंडनमधील प्राणीसंग्रहालयाने सिंहाचा सिटीस्कॅन केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. 

भानु नावाच्या सिंहाच्या कानाला संसर्ग जाला. त्याच्या कानावर उपचार करण्यासाठी CAT स्कॅन करावं लागलं. यावेळी सिंहाचं सिटीस्कॅन कसं झालं याचे फोटो समोर आले आहेत. लंडनच्या प्राणीसंग्रहालयात सिंहासाठी खास सिटीस्कॅन ठेवण्यात आला आहे. 

कानाचा संसर्ग झालेल्या सिंहाला आधी बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की भानुला ट्युमर आहे. त्यामुळे त्याला खूप जास्त त्रास होत आहे. तो सहन करू शकत नाही आणि डॉक्टरांना त्यावर उपचार करायचे आहेत.

भानु हा लुप्त होत चाललेल्या एशियान सिंहाच्या प्रजातीमधला एक सिंह आहे. त्याचं ब्रीडिंग प्रोग्राममधील एक महत्त्वाचा सदस्य आहे. त्याच्यावर उपचार होणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार होणं आवश्यक आहे. भानु 12 वर्षीय भानु ओरवल मेडिकेशनवर आहे. 

सध्या ह्या भानुचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तो खूपच अशक्त दिसत आहे. डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.