नेपाळमध्ये भूस्खलन; ६० जणांचा मृत्यू तर ४१ जण बेपत्ता

बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचं काम सुरु असून बचावकार्य सुरु आहे.

Updated: Jul 13, 2020, 05:28 PM IST
नेपाळमध्ये भूस्खलन; ६० जणांचा मृत्यू तर ४१ जण बेपत्ता title=
फोटो सौजन्य : ANI

काठमांडू : नेपाळमध्ये विविध भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये गेल्या चार दिवसांत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 41 जण बेपत्ता झाले आहेत. पश्चिम नेपाळमधील मयागदी जिल्ह्यात सर्वाधिक 27 जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचं काम सुरु असून बचावकार्य सुरु आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख डीएसपी किरण कुंवर यांनी सांगितलं की, हवामान परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर बचाव हेलिकॉप्टरही मदत सामग्रीसह भूस्खलन झालेल्या ठिकाणी दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यात भूस्खलनामध्ये जवळपास 43 घरं दबली गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक लोक भूस्खलनात झालेल्या ढिगाऱ्याखाली दबली गेली असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

भूस्खलनामुळे 400हून अधिक लोक प्रभावित झाले असून या भागतील लोकांना सामुदायिक भवन आणि शाळांमध्ये ठेवण्यात आलं आहे.

मोदींशी चर्चा झाल्यानंतर सुंदर पिचाईंचा मोठा निर्णय; Google भारतात इतक्या कोटींची गुंतवणूक करणार