ब्रिटीश शाही परिवारात तिसर्‍या राजकुमाराचं आगमन

लंडन - प्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. 

Updated: Apr 24, 2018, 10:37 AM IST
ब्रिटीश शाही परिवारात तिसर्‍या राजकुमाराचं आगमन  title=

लंडन - प्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. सोमवारी सकाळी लंडनमध्ये केटने एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. हा  शाही गादीचा पाचवा वारसदार असणार आहे.  

केंसिंग्टन पॅलेसचं ट्विट 

ऑक्टोबर महिन्यात केटच्या प्रेगन्सीबाबत माहिती देण्यात आली होती. सोमावारी सकाळी केटने एका मुलाला जन्म दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या बाळाचा जन्म लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सेंट मेरी हॉस्पिटल्समध्ये झाला. बाळाचे वजन 3.8 असून नवमाता आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. 'ड्युक ऑफ कॅंम्ब्रिज' या मुलाच्या जन्माच्या वेळेस उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

 

केट आणि विल्यम सात वर्षांपूर्वी विवाहबद्ध

केट आणि विल्यम हे सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले आहे. 29 एप्रिलला ही जोडी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजारा करणार आहेत. केट आणि विल्यम यांना प्रिंस जॉर्ज, त्यानंतर एक प्रिंसेंस शैरलोट आणि आता तिसरा मुलगा आहे. 

जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव 

केट आणि विल्यम यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनीदेखील ट्विटच्या माध्यमातून नव्या चिमुकल्याला शुभाशिर्वाद आणि केट - विल्यमचं अभिनंदन केलं आहे. 

रॉयल घरात लगनाची तयारी 

लंडनच्या राजघरात नव्या चिमुकल्याच्या आगमानाच्या आनंदासोबतच प्रिंस हॅरीच्या लग्नाची तयारीदेखील सुरू आहे. प्रिंस हॅरी अमेरिअक्न अभिनेत्री मेगन मार्कलसोबत 19 मे
  2018 रोजी विवाहबद्ध होणार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. अशी आहे प्रिन्स हॅरी आणि मेगेन मार्कलची लग्नपत्रिका...