फ्लॉरिडा : कोर्टाने एका भयानक प्रकरणात एका आरोपीला चक्क ३३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा आरोपी फ्लॉरिडा येथील राहणारा आहे. त्याच्यावर चाईल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप ठेवण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी सखोल तपास करून दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिलिपीन्सच्या सेक्स ट्रिप्सला जात होता. तसेच, छोट्या मुलांसोबत लैंगिक संबंध ठेऊन तो त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सार्वजनीक करत होता.
तपास अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड लिंच असे आरोपीचे नाव असून, त्याच्या या कृत्यासाठी ६ वर्षांच्या अल्पवयीन मुलांचाही वापर करण्यात आला होता. वेनिसचा नागरिक असलेल्या या आरोपीला फिलिपीन्स येथील विमानतळावरून विमानात चढताना २०१६मध्ये अटक करण्यात आली होती.
दरम्यान, प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा, आरोपीने सांगितले की, त्याने केलेल्या एकूण ट्रप्सपैकी कमीत कमी एक ट्रिप पीडित मुलांच्या आईनेच आयोजित केलेली असे. त्याने हेही सांगितले की, त्याची दोन मुले ही फिलिपीन्समध्ये राहतात.
न्यायालयाने आरोपीला गेल्याच वर्षी दोषी ठरवले होते. मात्र, त्याला सजा या वर्षी सुनावन्यात आली. कोर्टाने आरोपी लिंच याचे घरही जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.