पंचपक्वानं जेवणही सोडले, पिंजऱ्यातच झोपतो, माणूस बनून कुत्रा बनलेला व्यक्ती आता काय खातो?

Man become dog: 12 लाख रुपये खर्च करुन एक व्यक्ती कुत्रा बनला. त्याने माणसांची दिनचर्यादेखील सोडली आहे. तो आता माणसांसारखाच वागतो. 

Updated: Aug 1, 2023, 01:11 PM IST
पंचपक्वानं जेवणही सोडले, पिंजऱ्यातच झोपतो, माणूस बनून कुत्रा बनलेला व्यक्ती आता काय खातो? title=
|Japanese man who spent 16K to become a dog share his daily life

Man Become Dog News: कधी कोणाच्या डोक्यात काय येईल हे कोणी सांगू शकत नाही. जपानमधील एका व्यक्तीने कुत्र्याचे रुप घेण्यासाठी तब्बल 22 हजार डॉलर खर्च केले आहेत. भारतीय रुपयांप्रमाणे तब्बल 12 लाख रुपये खर्च केले आहेत. टोको असं या व्यक्तीचे नाव असून जेपपेट नावाच्या कंपनीने टोकोला कुत्र्यांच्या रुपात आणण्यासाठी मदत केली. यासाठी कंपनीने 40 दिवस लागले आहेत. 

कंपनीने टोकोला कोल्ली प्रजातीच्या कुत्र्यासारखे रुप दिले आहे. त्यानंतर तो आता सेम टू सेम कुत्र्यासारखे दिसू लागला आहे. तो कुत्र्यासारखाच चार पायांवर चालतो तसंच, कुत्र्यासारखा वागतो. त्याने यूट्यूब चॅनेलवर आय वाँट टू बी अॅनिमल नावाने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्याने त्याचा दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. टोकोने कुत्र्याचे रुप घेतल्यानंतर तो माणसांसारखा जेवतो का? असा प्रश्न त्याच्या युजर्सना पडला आहे. त्याचेही त्याने उत्तर दिले आहे. 

टोकोने युट्यूबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांने त्याची दिनचर्या शेअर केली आहे. टोको दिवसातून तीन वेळा आहार घेतो. त्याचा आहारात पोषक तत्वे असलेले डॉग फूड आहे. युट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत टोको कुत्र्यांप्रमाणेच शेपूट हलवून भूक लागल्याची माहिती देत आहे. त्यानंतर एक महिला भांड्यात डॉग फुड घेऊन येत आहे. टोको मोठ्या आवडीने ते जेवण जेवत आहेत. इतकंच नव्हे तर, जेवण झाल्यानंतर शेपूट हलवून तो महिलेचे आभार मानायचे ही विसरत नाही. 

टोकोने कुत्र्याचे रुप धारण केल्यानंतर यूट्यूब चॅनेलवर त्याचे फॉलोवर्स वाढले आहेत. त्याचे व्हिडिओ तब्बल 10 लाखांहून अधिकवेळा पाहिले गेले आहेत. अलीकडेच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत टोकोच्या गळ्यात पट्टा दिसत आहे. तसंच, बागेत तो फेरफटका मारताना दिसत आहे. इतर कुत्र्यांसारखेच त्याचे वर्तन आहे. 

दरम्यान, एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, टोकोला लहानपणापासून कुत्रा व्हायचं होतं. पण त्याच्या या छंदाबद्दल कोणाला काही कळू नये अशी त्याची इच्छा होती. नाहीतर लोक थट्टा करतील म्हणून त्याने लपवून ठेवले. याच कारणामुळं टोको त्याचा खरा चेहरा लोकांना दाखवू शकत नाहीये, असंही त्याने म्हटलं आहे.