'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती

ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय. 

Updated: Dec 9, 2023, 10:19 PM IST
'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती title=

World's largest nuclear fusion reactor Japan JT-60SA : वीज हा प्रत्येकाच्या जिवनाचा प्रमुख भाग आहे. घर असो वा दुकान, शाळा असो वा एखादं कार्यालय, छोट्या मोठ्या उद्योगांपासून ते  पर्यंत प्रत्येक गोष्टीला वीज लागतेच. आपल्याकडे कोळशापासून, धरणातील पाण्यापासून तसच युरेनिअमपासून वीज निर्मिती केली जाते. याशिवाय सौर उर्जेसारखे पारंपरिक उर्जास्त्रोतही उपयोगात आणले जातात. मात्र जपनानं याही पुढे जाऊन क्रांतीकारी पाऊल टाकलंय. जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वात मोठ्या न्यूक्लिअर प्लँटचं काम सुरू आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्यूजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. आतापर्यंत जितके न्यूक्लिअर रिऍक्टर काम करत आहेत, मात्र हा प्लांट न्यूक्लिअर फिजनवर आधारित आहेत. त्याचा अर्थ आहे की तिथं अणुच्या विखंडनातून ऊर्जा निर्माण केली जाते.

नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचं नाव 'जेटी 60 एसओ' असं आहे. त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जाते.  हे रिअ‍ॅक्टर सुमारे सहा मजली उंच आहे. डोनट या खाद्यपदार्थाच्या आकारात उपकरणाची निर्मिती करण्यात आलीय. त्यात प्लाझ्मा वेगाने फिरल्यावर तापमानाचा स्तर 20 कोटी अंशांवर जातो. जगभरातील 500 अभियंते या प्रकल्पात सहभागी आहेत. 

या उर्जेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार्बनडाय ऑक्साईड मुक्त म्हणजेच प्रदूषणमुक्त उर्जा मानली जाते. सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणारा जपान हा जगातील पहिलाच देश ठरलाय. त्यांचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास हा प्रकल्प जगासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. 

चीननं बनवला कृत्रिम सूर्य?

चीनच्या आकाशात आता एकाचवेळी दोन दोन सूर्य दिसल्यास नवल वाटू देऊ नका. चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य तयार केल्याचा दावा केलाय. चीनच्या सरकारी मीडियानं चिनी शास्त्रज्ञांना असा सूर्य बनवण्यात यश आल्याचा दावा केलाय. 2006मध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्य बनवण्याच्या प्रकल्पाला सुरुवात केली. कृत्रिम सूर्याला त्यांनी एचएल-2एम असं नाव दिलंय. या चायना मेड सूर्याचं 15 कोटी डिग्री सेल्सियस तापमान असणार आहे. सूर्यापेक्षा चिनी सूर्य 10 पट तेजस्वी असेल. अणू फ्यूजनच्या आधारे हा सूर्य तयार करण्यात आलाय. प्रतिकूल हवामानातही सौरऊर्जेचा स्त्रोत चीनकडं कायम राहणार आहे. हा सूर्य म्हणजे चीनकडे अगणित ऊर्जा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. चीनचा सूर्य हा इतर जगासाठी आव्हान ठरणार आहे. चीनकडं अक्षय उर्जेचं भंडारच उपलब्ध होणार आहे. या सूर्याच्या जोरावर चीनचा आक्रमकपणा वाढणार असून त्यांची विस्तारवादी भूमिका इतर देशांसाठी मारक ठरण्याची भीती व्यक्त केली जातेय.