इराण-इराक सीमेवरील भूकंपातील मृतांचा आकडा ३३०वर

इराणच्या कर्मनशाह प्रांताला बसलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ३३० जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ४ हजार नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. 

Updated: Nov 13, 2017, 05:10 PM IST
इराण-इराक सीमेवरील भूकंपातील मृतांचा आकडा ३३०वर title=

तेहरान : इराणच्या कर्मनशाह प्रांताला बसलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ३३० जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ४ हजार नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. 

इराण-इराक सीमेवर झालेल्या ७.३ रिश्टर स्केल भूकंपामुळे इराकच्या काही भागालाही हादरा दिला असून दोन्ही देशांमध्ये अनेक इमारतींची पडझड झाल्याची माहिती आहे. इराकमध्येही सात जणांचा मृत्यू झाला असून साडेपाचशे नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. 

भूकंपाचं केंद्र इराकच्या हलाबा शहरापासून ३१ किलोमीटर अंतरावर जमिनीखाली २३.२ किलोमीटर खोल असल्याचं अमेरिकन भूगर्भ परीक्षण संस्थेनं म्हटलंय. या शक्तिशाली भूकंपानंतर किमान १०० छोटे हादरे बसल्याची माहिती समोर आलीये.