नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 व्या आशियाई परिषदेसाठी फिलीपिन्सच्या राजधानी मनिलामध्ये आहेत. सोमवारी, पंतप्रधान मोदींनी एका 9 वर्षीय फिलीपीनच्या मुलाला भेटण्य़ासाठी वेळ काढला.
कार्लो माईगेल सिलवानो नावाचा हा मुलगा फिलिपिन्सच्या बुलाकन प्रांतातला राहणारा आहे. 'जयपूर फूट' लावलेल्या हजारो मुलांपैकी तो एक आहे. मनीलातील महावीर फिलीपीन्स फाऊंडेशनमध्ये पंतप्रधान मोदी आणि कार्लो यांची भेट झाली. कार्लो यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की तो मोठा होऊन पोलिसांत जाऊ इच्छितो. पंतप्रधान मोदी यांनी कार्लोच्या भेटीबद्दल ट्विट केले आहे.
पंतप्रधानांनी लिहिले की, "माझ्या लहान मित्राने मला सांगितले की त्याला मोठे होऊन पोलीस बनवायचे आहे. हे पाहून आनंद झाला की जयपूर फूट या मुलाच्या आकांक्षा आणि यासारख्या अनेक तरुणांना आशांना पंख देत आहे. ' पंतप्रधानांनी सांगितले की मनिलातील महावीर फाऊंडेशनला दिलेली भेट शानदार होती.
महावीर फाउंडेशन म्हणजे काय?
महावीर फाऊंडेशनचे बनलेल कृत्रिम पाय खूपच स्वस्त असतात. चाळीस वर्षांपूर्वी भगवान महावीर विकलांग समितीने जयपूर फुट बनवला होता. जयपूर फूट गुडघ्यापुढे ज्यांचा पाय नसतो अशा लोकांना लावला जातो. 1989 मध्ये याची सुरुवात झाली होती. या पायामुळे फिलिपाईन्समधील 15 हजार लोकांना नवीन जीवन मिळाले आहे.