नवी दिल्ली: मोबाईल कंपन्यांमध्ये सर्वात बेस्ट फोन कोणता हा प्रश्न विचारला की सर्वांच्या तोंडी एकच उत्तर असतं आयफोन. आयफोन मिळाला तर कुणाला आवडणार नाही. एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला माशांसाठी जाळं टाकलेलं असताना त्यामध्ये आयफोन अडकलेला मिळाला. पाण्यात आयफोन मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने याची माहिती फेसबुकवर टाकताच धक्कादायक खुलासा समोर आला.
नेमकं काय प्रकरण
मच्छीमार जेसन रॉबिनसन, गेल्या रविवारी पहाटे नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात काहीतरी विचित्र आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही वस्तू बाहेर काढताच त्यांना आश्चर्य वाटले. तो आश्चर्यचकितपणे म्हणाले, 'हा आयफोन आहे.' त्यांनी त्याला स्वच्छ केलं आणि फोनचा फोटो काढला आणि आपल्या बायकोला नदीत आयफोन सापडल्याचे सांगितले.
फोनवर लागलेली माती स्वच्छ करताना त्यांना एक फोटो मिळाला. या फोटोमध्ये एक युवती एका तरुणाला कडेवर घेऊन उभी असल्याचं दिसत होतं. हा फोटो पाहून मासेमारी करणाऱ्या व्यक्तीनं ठरवलं की या कपलला शोधून काढायचंय त्याने फेसबुकवर हा फोटो अपलोड करून पोस्ट लिहिली.
रॉबिन्सन यांच्या म्हणण्यानुसार, मला कायम चांगली काम करण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे मदत करण्याची वृत्ती माझ्याकडे आली. त्यातून मला खूप समाधान मिळत गेलं. फेसबुकवर फोटो पोस्ट करताच 5 मिनिटांच्या आता या महिलेची ओळख मिळाली. रिले जॉनसन असा या महिलेचं नाव होतं. हा फोन पाहून ती खूप खूश दिसत होती.
जॉनसन पुढे म्हणाल्या की, मागच्या तँक्सगिविंगमध्ये ती आपल्या मित्र-कुटुंबासोबत फियारला आली होती. त्यावेळी तिचा फोन हरवला. 8 महिन्यांनंतर हा फोन मिळाला आहे. जॉनसन यांचे पती घरापासून दूर काम करतात. त्यामुळे त्यांचा फोटो कायम तिच्या जवळ ती घेऊन फिरते.
हा फोटो 2018 मध्ये काढण्यात आला होता. त्यावेळी रिले जॉनसन डेट करत होत्या. मर्टल बीच स्टेट पार्क इथे त्यांनी हा फोटो काढला होता. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर जॉनसन मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला भेटल्या त्यांनी त्याचे खूप आभार मानले. मासेमारी करणाऱ्या रॉबिन्सन यांनी फोन आणि फोटो दोन्ही इमानदारीने त्यांनी परत केला.