रोमन्स वापरात असलेली अंडरवेअर ते आताची बिकिनी... वाचा अंडरवेअर्सचा इतिहास

प्राचीन काळात गुप्तांगाच्या सुरक्षेतीततेसाठी आणि स्वच्छतेसाठी अंडरवेअर्सचा वापर व्हायचा. मात्र पूर्वी आतासारख्या अंडरवेअर्स नव्हत्या. अंडरवेअर्स घालण्याचं प्रमुख कारण म्हणजे गुप्तांगाला रोगांपासून दूर ठेवणे. 

Updated: Oct 1, 2022, 06:04 PM IST
रोमन्स वापरात असलेली अंडरवेअर ते आताची बिकिनी... वाचा अंडरवेअर्सचा इतिहास title=

History of Underweres: आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि तितकीच दुर्लक्षित गोष्ट म्हणजे अंडरवेअर (Underwere). आपण बाजारात जातो, आपल्याला हवे तसे कपडे विकत घेतो, हवे तसे बूट विकत घेतो, हव्या तशा अंडरवेअर्स पण विकत घेतो. मात्र, कपडे किंवा बूट किंवा इतर कोणताही गोष्टी विकत घेताना आपण ज्याप्रकारे ट्राय करून , निरखून, कम्फर्ट पाहून त्या गोष्टी खरेदी करतो, तसं अंडरवेअर्सबाबत होत नाही. अंडरवेअर्सची खरेदी करण्यासाठी आपण दुकानात जातो, दुकानदाराला ब्रँड किंवा साईझ सांगतो आणि अंडरवेअर घेऊन येतो. अनेकदा काहीजण त्यालाच कोणतीही अंडरवेअर द्यायला सांगतो. आपल्या शरीराला ज्या प्रकारच्या अंडरवेअरची सवय झाली असेल अशी अंडरवेअर आपण दररोजच्या आयुष्यात वापरतो. आपल्या आयुष्यात अंडरवेअरला प्रचंड महत्त्व आहे. मात्र, तुम्हाला अंडरवेअरचा इतिहास माहिती आहे का? बहुतेकांना याबाबत काहीही माहिती नाही. म्हणूनच जाणून घेऊयात आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक असणाऱ्या अंडरवेअर्सच्या इतिहासाबाबत. 

प्राचीन काळात गुप्तांगाच्या सुरक्षेतीततेसाठी आणि स्वच्छतेसाठी अंडरवेअर्सचा वापर व्हायचा. मात्र पूर्वी आतासारख्या अंडरवेअर्स नव्हत्या. अंडरवेअर्स घालण्याचं प्रमुख कारण म्हणजे गुप्तांगाला रोगांपासून दूर ठेवणे. 

रोमन्स कोणती अंडरवेअर वापरायचे? (Roman Underwere)

पूर्वीच्या काळात गुप्तांगावर केवळ एक कापड बांधलं जायचं. आताही अंडरवेअरला आपल्या कपड्यांच्या तुलनेत तितकं महत्त्व दिलं जात नाही. पूर्वीतर अंडरवेअर्सला अजिबात महत्त्व दिलं जायचं नाही. प्राचीन काळात अंडरवेअरला (Subligaculum) सबलीगॅकुलम असं बोललं जायचं. प्राचीन रोमन्स ( ancient roman) याचा वापर करायचे. सबलीगॅकुलम हा दिसायला साधारणतः लंगोटीसारखा असायचा. त्यावेळेच्या स्त्रिया आणि पुरीष दोघे याचा वापर करायचे. 

मध्ययुगीन काळातील अंडरवेअर्स ( Middle Ages) 

मध्ययुगीन काळात पुरुषांनी खादी म्हणजेच लीननच्या अंडरवेअर्स ( linen underwere ) वापरण्यास सुरुवात केली. यांना ब्रेज असं बोललं जायचं. त्यावेळी केवळ पुरुषच ब्रेज वापरायचे. महिला अंडरवेअरसाठी कपड्याचाच वापर करायच्या. 

तब्बल सोळाव्या शतकात महिलांनी क्रोसेट वापरण्यास सुरुवात केली 

19 व्या शतकातील अंडरवेर्सचा ट्रेंड 

जगभरात एकोणीसाव्या शतकात (19th Century Underweres)  अंडरवेअरचा ट्रेंड वाढलेला पाहायला मिळाला. सुरुवातीला मिलिट्रीमधील लोकांच्या सोईप्रमाणे अंडरवेअर्सही निर्मिती करण्यात आली.  जसजसा काळ पुढे गेला तसे तसे त्यामध्ये वेळ आणि मागणीनुसार बदल केले गेलेत. 

कधी सुरु झाला बिकीनीचा वापर? ( Use of Bikini) 

काळानुरूप अंडरवेअर्सच्या मागणीत वाढ झाली. सुरुवातीला मोठ्या असणाऱ्या अंडरवेअर्स या लहान होत गेल्यात. साधारणतः 1950 पासून पाश्चात्य महिलांनी बिकिनी वापर करण्यास सुरुवात केली. पुरुषांच्या मोठ्या अंडरवेअर्स देखील एव्हाना आकाराने लहान झालेल्या.