भारताचा दणका ! चीन सैन्य पँगाँग भागातून संपूर्णतः घेणार माघार

चीन सैन्य पँगाँग भागातून संपूर्णतः माघार घेणार 

Updated: Feb 17, 2021, 09:32 AM IST
भारताचा दणका ! चीन सैन्य पँगाँग भागातून संपूर्णतः घेणार माघार  title=

नवी दिल्ली :  या आठवड्याच्या अखेरीस पूर्व लडाखमध्ये चीन सैन्य (China Army) पँगाँग भागातून संपूर्णतः माघार घेणार आहे. त्यानंतर गोग्रा, हॉटस्प्रिंग, देपसांग या भागातून चीनही माघार सुरू होणार आहे. या तीन भागात कशापद्धतीने माघार होईल याचा प्लॅन भारत चीन लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित होईल. चीनने आत्तापर्यंत या भागातून दीडशे रणगाडे आणि 5000 हून अधिक सैनिक मागे घेतले आहेत. 

चिनी सैनिकांनी माघार घेत फिंगर 8 च्या पूर्व भागात जाणार आहेत. चिनी सैनिकांनी माघार घेताना उभारलेले तंबूही तोडलेत. भारतीय फौजा फिंगर 3 या आपल्या बेस कँपवर कायम राहणार आहेत. दरम्यान फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान पेट्रोलिंग होणार नाही असं ठरलं आहे.

सैनिकांची संख्या कमी

पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने पँगाँग भागात फिंगर 4 पर्यंत माघार घेतलीय. सैन्य माघारीसोबतच केलेलं बांधकामही चीनने हटवलंय. फिंगर ५ आणि ६ दरम्यान चीनने लेकमध्ये बोटींसाठी केलेले प्लॅटफॉर्मही हटवलेत. चीनने अपेक्षित माघार घेतल्यावर आता भारतानेही आपली सैनिकांची संख्या कमी करायला सुरूवात केलीय. जिथे चिनी आणि भारतीय सैनिक आमनेसामने होते तिथली संख्याही कमी करण्यात येत आहे.

चीनला धडकी 

बिकानेरच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये दिवस-रात्र हा युद्धाभ्यास सुरू आहे. एका महिन्यात राजस्थानमधला हा दुसरा मोठा युद्धाभ्यास आहे. यापूर्वी 21 दिवस भारत आणि फ्रान्सच्या सेनांनीही असाच सराव केलाय. या युद्धाभ्यासाची दृष्य भारतीयांना अभिमान वाटावा अशीच आहेत. मात्र पाकिस्तानच्या सीमेच्या इतक्या जवळ धडाडणाऱ्या या तोफांनी पाकिस्तान आणि चीनला मात्र धडकी भरलीये.