मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

 India-Pakistan Relations: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले असून एकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 

Updated: Aug 12, 2022, 08:10 AM IST
मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू title=

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले असून एकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पाकिस्तान नौदलाने, 9 क्रू मेंबर्सना वाचवल्याचा दावा केला आहे.

अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाल्यानंतर आम्ही मदतीसाठी तात्काळ धाव घेतली, असे पाकिस्तान नौदलाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या जनसंपर्क महासंचालकांनी सांगितले की, बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या तटीय शहराजवळ 9 ऑगस्ट रोजी भारतीय जहाज  'जमना सागर' बुडाल्याची घटना घडली. त्यात 10 क्रू मेंबर्स होते, त्यापैकी एकाचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला.

क्रू मेंबरचा मृतदेह सापडला

नौदलाला एका जहाजाबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर पाकिस्तान सागरी माहिती केंद्राने जवळच्या व्यापारी जहाज 'MT Kruibeke' ला भारतीय जहाजाच्या क्रू सदस्यांना आवश्यक मदत पुरवण्याची विनंती केली. व्यापारी जहाजाने नऊ क्रू मेंबर्सची सुटका केली, असे पाकिस्तानने आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यात नमुद केले आहे की, पाकिस्तान नौदलाच्या जहाजाला बेपत्ता क्रू मेंबरचा नंतर एक मृतदेह सापडला, जो पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीकडे सोपवण्यात आला. पाकिस्तानच्या प्रादेशिक पाण्याचे क्षेत्र 12 नॉटिकल मैल आहे. 2015 मध्ये त्याचा सागरी क्षेत्र (EEZ) 290,000 चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही मदत करता आली.

आमच्या व्यापारी जहाजाने नऊ क्रू मेंबर्सची समुद्रातून सुखरुप सुटका केली आणि दुबईतील एका बंदरावर त्यांना सोडले, असेही निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, दोन हेलिकॉप्टरसह पाकिस्तानी नौदलाचे जहाज देखील या भागात पोहोचले आणि मदतकार्य सुरु केले. 

दरम्यान, उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. राजनैतिक सूत्रांनी एका माध्यम संस्थेला ही माहिती दिली. 'डेली जंग'ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, SCO शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी होणार आहे, जिथे संघटनेचे नेते प्रादेशिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र भेटतील.