Viral Video : फूटबॉलसारखं उडवलं, जमिनीवर आपटलं, चिडलेल्या रेड्याने तरुणाला अस्मान दाखवलं

रेड्यांची स्पर्धा सुरू असताना एक व्यक्तीमध्ये घुसतो आणि त्या रेड्यांना चितवण्याचा प्रयत्न करतो. पण यातला एक रेडा चिडतो आणि या व्यक्तीला इंगाच दाखवतो.

Updated: Aug 11, 2022, 11:14 PM IST
Viral Video : फूटबॉलसारखं उडवलं, जमिनीवर आपटलं, चिडलेल्या रेड्याने तरुणाला अस्मान दाखवलं title=

Viral Video : आता व्हिडिओ आहे रेड्यांच्या स्पर्धेचा. रेड्यांची स्पर्धा सुरू असताना एक व्यक्तीमध्ये घुसतो आणि त्या रेड्यांना चितवण्याचा प्रयत्न करतो. पण यातला एक रेडा चिडतो आणि या व्यक्तीला इंगाच दाखवतो. नंतर पुढे काय घडतं चला पाहूयात. (fact check viral polkhol bull fight man video viral on social media) 

रेड्यांची स्पर्धा सुरू असते. रेडे शर्यतीच्या तयारीत असतात. त्यावेळी एक तरुण हातात निळ्या कपडा घेऊन या रेड्यांसमोर येतो. बैलगाडा शर्यती प्रमाणे या रेड्यांना पळवलं जाणार होतं. हे रेडे शांत असताना या तरुणाने त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 

प्रेक्षकही आपल्याकडे पाहत आहेत म्हटल्यावर यालाही आणखीन जोश आला. याने रेड्यांना पळवण्यासाठी निळा कपडा दाखवला आणि शांत रेडा चवताळला. बघता बघता या रेड्यानं याला शिंगावरच घेतलं. फुटबॉलसारखं उडवलं आणि धाडखन खाली आपटलं. बराच वेळ हा थरार सुरू होता.

या रेड्याचं रौद्ररूप पाहून दुसरा रेडाही पळाला. बघा रेड्याला डिवचणं याला किती महागात पडलं. रेड्याच्या तावडीतून सुटण्याचा हा प्रयत्न करत होता.  रेडा याला शिंगानं मारत होता. पण, याची सुटका करायला जायची कुणाचीच हिंमत होईना. 

बॅरिकेड्सच्या बाहेर उभे असलेले लोक आरडाओरड करत होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर एक व्यक्ती गुलाबी रंगाचा कपडा घेऊन आली. त्यावेळी हा रेडा पळून गेला. रेड्याने तरुणाची इतकी भयंकर अवस्था केली ती पाहूनच धडकी भरते. त्याच्या अंगावर कपडेही नीट राहिले नाहीत. 

रेडा पळाल्यावर काही लोकांनी त्याला उचललं आणि एका गाडीवरून रुग्णालयात नेलं. रेड्याच्या हल्ल्यात हा तरूण गंभीर जखमी झाला. त्यामुळे अशा प्राण्यांशी मस्ती करण्याचं धाडसं करू नका.