सिंगापूर : भारतीय वंशाच्या एका व्यक्तिने विदेशी कंपनीला चांगलाच इंगा दाखवला आहे. कंपनीने या व्यक्तिला चक्क ४० लाख सिंगापुरीयन डॉलर (२९ लाख डॉलर ) इतके पैसे दिले आहेत.
कंपनीने इतके पैसे या व्यक्तिला दिले ते केवळ भेट म्हणून नव्हे तर, हे पैसे नुकसानभरपाई म्हणून द्यावे लागले आहेत. कारण की, पाठीमागील कंपनीने दिलेल्या रेफरन्स लेटरमध्ये या व्यक्तीबद्धल तीव्र शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. या लेटरमुळे या व्यक्तिला चालून आलेली चांगली नोकरी गमवावी लागली होती. द स्ट्रेट टाईम्सने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, रमेश कृष्णन असे या व्यक्तिचे नाव आहे. कृष्णन हे एएक्सए लाईफ इन्श्योरन्स सिंगापूर कंपनी सोबत काम करत होते.
दरम्यन, त्यांनी कंपनी सोडली आणि दूसऱ्या कंपनीची ऑफर स्विकारली. मात्र, एएक्सए लाईफ इन्श्योरन्सने चलाकी करत दिलेल्या रेफरन्स लेटरवर कृष्णन यांच्या कामासंदर्भात चुकीची माहिती दिली. त्यामुळे कृष्णन यांनी 2012 मध्ये एएक्सएवर दिशाभूल आणि मानहानीचा दावा ठोकला होता. न्यायमूर्ती जॉर्ज वेई यांच्या देखरेखेखाली चाललेल्या या खटल्यात कृष्णन यांनी 6.3 कोटी सिंगापुरियन डॉलर देण्याची मागणी कंपनीकडे केली. महत्त्वाचे असे की, एएक्सए नुकसानभरापाई म्हणून एक सिंगापुरियन डॉलर देण्यास तयार होती. मात्र,कृष्णन आपल्या मुद्द्यावर ठाम होते. ते 2015 मध्ये हा खटला हारलेही होते. पण, त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुनर्याचिका दाखल केली.
दुसऱ्या वेळी मात्र नीयती कृष्णन यांच्या बाजूने होती. एएक्स सिंगापूरने कृष्णन यांची नियूक्ती योग्य पद्धतीने केली नव्हती. तसेच, दिलेले लेटरही दिशाभूल करणारे होते. सोबत, कंपनी सोडताना कंपनीने या कंपनीतच थांबण्यासाठी कृष्ण यांच्यावर दबाव टाकल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यन, न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून कृष्णन यांच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, कृष्णन यांनी या निकालाबाबत आनंद व्यक्त केला. तसेच, न्याय मिळतो हे लोकांना कळाले. लोकांनी आपल्या अन्यायाबाबत पूढे यावे असा भावना व्यक्त केल्या.